उत्तर प्रदेशच्या बांदामधून एका तरूणीने तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. तरूणी व्हिडिओत म्हणताना दिसत आहे की, परिवातील लोक तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी करत आहेत. पण तिला तिच्या मनाने कोर्ट मॅरेज करायचं आहे. तिने मीडियासोबतच पोलिसांकडेही मदत मागितली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बांदाच्या एसपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
व्हायरल झालेला व्हिडीओ कालिंजर भागातील एका गावातील आहे. व्हिडिओत तरूणी म्हणत आहे की, 'मी व्हिडीओ पूर्ण शुद्धीत आणि कुणाच्याही दबावाशिवाय बनवत आहे. माझ्याकडून माझा हक्क हिरावला जात आहे. माझा परिवार मला खूप त्रास देत आहे. मला मारहाण केली जाते, ओरडता आणि मला ब्लॅकमेल करतात. मला घरात कैद करून ठेवलं आहे'.
ती म्हणाली की, 'परिवारातील लोक माझ्या सहमतीशिवाय माझं लग्न करत आहेत. पण मला माझ्या पसंतीने लग्न करायचं आहे. मी माझ्या जातीमधीलच एक तरूणावर प्रेम करते. आम्ही दोघेही वयस्क आहोत. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला लग्न करायचं आहे. तरूणाचा परिवारही या लग्नासाठी तयार आहे. पण माझा परिवार या लग्नासाठी तयार नाही आणि ते धमकी देतात.
'मला कोर्ट मॅरेज करायचं आहे. लग्न झाल्यानंतर मला माझ्या परिवारासोबत काही संबंध ठेवायचा नाहीये. मी माझ्या परिवाराला विनंती करते की, मला त्रास देऊ नका. माझी पोलीस, मीडिया यांनाही विनंती आहे की, माझं कोर्ट मॅरेज करून द्या. मी माझ्या मर्जीने कोर्टात येणार, माझ्यावर कोणताही दबाव नसेल'. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर यावर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. पोलीस या व्हिडिओची चौकशी करत आहेत.
बांदा येथील एसपी अभिनंदन यांनी सांगितलं की, तरूणीचा व्हायरल व्हिडीओ समोर आला आहे. सीओ आणि पोलीस अधिकाऱ्यांना तिच्या परिवारासोबत बोलण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्हिडिओची चौकशी केल्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.