शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

पळालो नाहीच, पळवले गेले, ‘त्या’ सर्वांची नावे सांगणार; ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 6:40 AM

ड्रग्ज तस्करी प्रकरणात २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ललित याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोबारा केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: पोलिसांना सतत गुंगारा देणारा ३०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणातील प्रमुख आरोपी ललित पाटील (३७) याला कर्नाटकातून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला मुंबईत आणण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाटील याने पुण्याच्या ससून रुग्णालयातून आपण पळालो नाही तर पळवले गेले. यामागे कोणाचा हात आहे, त्या सर्वांची नावे सांगणार, असा दावा केल्याने खळबळ उडाली. ललितला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

ड्रग्ज तस्करी प्रकरणात २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या ललित याने २ ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पोबारा केला होता. ललित पळून गेल्यानंतर आरोप-प्रत्यारोप वाढले. मुंबई पोलिसांच्या पथकाने नाशिकच्या एमआयडीसी परिसरात अलीकडेच ३०० कोटींचा १५० किलो मेफेड्रॉन जप्त केले. हा कारखाना ललित पाटीलचा भाऊ भूषण याच्या मालकीचा असल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.

असा काढला माग...पुण्यातून पळ काढल्यानंतर ललितने चाळीसगाव गाठले. तेथून धुळ्याला जाऊन भाडेतत्त्वाने वाहन घेतले. तेथून छत्रपती संभाजीनगरमार्गे गुजरातमधील जामनगरमध्ये गेला. पाटील यांचे गुजरातमध्ये काही नातेवाईक आहेत. त्यांच्या मदतीने सोलापुरात आला. पुढे, विजापूरमार्गे कर्नाटक गाठले. विजापूरनंतर तो चन्नासंद्रा गावात गेला. पोलिस त्याच्या नातेवाइकांवर लक्ष ठेवून होते. 

अशी केली अटकललित पाटीलच्या मागावर असलेल्या पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री बंगळुरूजवळील चन्नासंद्रा येथील हॉटेलमधून पाटीलला ताब्यात घेत अटक केल्याची माहिती सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली. बुधवारी त्याला अंधेरी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. ललितचा भाऊ भूषणचाही ताबा पोलिस घेणार असून, त्यासाठी कायदेशीर प्रक्रिया करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी पाटीलसह आतापर्यंत १५ आरोपींना साकीनाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीच्या अटकेनंतर त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांच्या मालमत्तांच्या दृष्टीनेही तपास करणार आहोत, असे पोलिस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी सांगितले.

सर्व लागेबांधे बाहेर येणार ललित पाटील याच्या अटकेनंतर मोठे लागेबांधे बाहेर येऊन बोलणाऱ्यांची तोंडे बंद होणार आहेत. ललित आज काय बोलतोय, यापेक्षा जे लागेबांधे बाहेर येणार आहेत, ते महत्त्वाचे असणार आहेत. तसेच, सर्व दोषींवर कारवाई केली जाईल.- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

टॅग्स :Drugsअमली पदार्थsasoon hospitalससून हॉस्पिटलMumbai policeमुंबई पोलीस