जम्मू - काश्मीर : पाकिस्तानमध्ये हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याचा संशय असलेल्या कबुतराला जम्मू आणि काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आयबीने पकडले आहे, अशी माहिती सोमवारी अधिकाऱ्यांनी दिली.अधिकारी पुढे म्हणाले की, पाकिस्तानच्या दिशेने उडत आलेल्या "कोडेड मेसेज" असलेले कबूतर हिरानगर सेक्टरमधील मान्यारी गावच्या रहिवाशांनी ताब्यात घेतल्यानंतर आयबीच्या ताब्यात दिले. संबंधित सुरक्षा यंत्रणा "कोडेड मेसेज" उलगडण्याचे काम करीत आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी सांगितले की, “गावकऱ्यांनी काल कबुतराला (स्थानिक पोलिस स्टेशनला) सुपूर्द केले. त्याच्या एका पायात अंगठी जोडलेली दिसत होती आणि त्यावर काही तपास सुरू आहे,” कठुआचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक शैलेंद्र मिश्रा यांनी पुढे माहिती दिली.
Lockdown: धक्कादायक! भाड्याचे पैसे देण्याऐवजी घरमालकांकडून महिलांकडे लैंगिक सुखाची मागणी
बेपत्ता मुलीची संशयास्पदरित्या हत्या, बलात्कार केल्याचा कुटुंबीयांचा आरोप
धक्कादायक! एटीएम कार्डचा पिन नंबर न दिल्याने महिलेवर केला बलात्कार