शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

बेरोजगारीला कंटाळून श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला; आयबीने अपहरणाचा कट उधळला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 7:19 AM

मिर्झा आवेज बेग (वय २१), शेख साकीब शेख अन्वर (२०), उबेद खान शेर खान (२०) अशा तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

बुलडाणा : उद्योजक तथा श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करून त्यांच्या कुटुंबीयांकडून कोट्यवधी रुपये उकळून झटपट श्रीमंत होण्याच्या इराद्याने बुलडाणा अर्बन बँकेचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या अपहरणाचा कट आखत असलेल्या बुलडाण्यातील तिघांना दिल्ली आयबीने ताब्यात घेऊन बुलडाणा पोलिसांच्या ताब्यात दिले. बुलडाणा पोलिसांनी तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याचे  ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले. 

मिर्झा आवेज बेग (वय २१), शेख साकीब शेख अन्वर (२०), उबेद खान शेर खान (२०) अशा तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. तिघेही बुलडाण्यातील शेर-ए-अली चौकातील रहिवासी आहेत. हे तिघेही ७ सप्टेंबरला दर्शनाकरिता अजमेर येथे गेले होते. बेरोजगारीला कंटाळून त्यांनी श्रीमंत होण्याचा प्लॅन आखला. बँक लुटण्यासाठी त्यांनी २५०० रुपयांची एक एअर गन विकत घेतली. बँक लुटल्यानंतर कार खरेदी करायची, ऑफिस बनवायचे आणि एखाद्या श्रीमंत व्यक्तींचे अपहरण करून कोट्यवधी रुपये कमवायचे, अशी त्यांची योजना होती. 

दरम्यान, ते आयबीच्या रडावर आले. त्यांना संशयित म्हणून ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती बुलडाणा पोलिसांना देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले.  स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या चौकशीत बुलडाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक व भाजपचे माजी आमदार चैनसुख संचेती यांचेभविष्यात अपहरण करण्याचा त्यांचा  बेत होता, असे ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहितीही काटकर यांनी दिली.

माझा काेणीही शत्रू नाही, हा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती मी पण पाेलिसांकडून घेत आहे. त्यानंतर सविस्तर बाेलता येईल. - राधेश्याम चांडक, संस्थापक बुलडाणा अर्बन