शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक का लढवत नाहीत? राज ठाकरेंनी सांगितला बाळासाहेब ठाकरेंंचा 'तो' किस्सा...
2
चक्रवर्तीच्या चक्रव्यूहमध्ये अर्धा संघ फसला; पण तरी द. आफ्रिकेनं टीम इंडियाचा विजय रथ रोखला!
3
'अमितला भेटण्यासाठी तुम्हाला अपॉईंटमेंटची गरज लागणार नाही', मुलासाठी राज ठाकरेंची सभा
4
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा नव्हे हा थापानामा; एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
5
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पोलिसांची मोठी कारवाई! कल्याणमध्ये व्हॅनमध्ये १ कोटी ३० लाखांची सापडली रोकड
7
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठे यश, मुख्य शूटर शिवकुमारला उत्तरप्रदेशातून अटक
8
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
9
'तुमच्या दैनंदिन अडचणी नरेंद्र मोदींना सांगणार का?' राज ठाकरेंचा मतदारांना सवाल...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राजेश लाटकरांसाठी मधुरिमाराजे अन् मालोजीराजे मैदानात; पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक
11
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
12
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
13
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
14
“त्यांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला, आता २३ तारखेला टकमक टोक दाखवायचे”: उद्धव ठाकरे
15
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
16
“‘लाडकी बहीण’च्या नावाखाली दिशाभूल करायचा प्रयत्न”; वडेट्टीवार बाप-लेकीची महायुतीवर टीका
17
अजित पवार २० ते २५ जागा जिंकतील, तर भाजप...; विनोद तावडेंनी सांगितला आकडा
18
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
19
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोठी बातमी! विक्रोळीत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा सापडल्या

पोलिसांनी चुकून चलान कापलं तर ते असं करा रद्द, दंड नाही लागणार भरावा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 4:53 PM

Traffic Police : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार शिक्षा केली जाते. दंड आकारण्यापासून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे.

चुका कोणाकडूनही होऊ शकतात, पण जेव्हा तुम्ही वाहनाने रस्त्यावरून प्रवास करत असाल, तेव्हा चुकांची व्याप्ती कमी करायला हवी. वाहतुकीचे सर्व नियम पूर्णपणे पाळले तरच हे घडेल. लोक वाहतुकीचे नियम पाळतात का याकडे केंद्र सरकार आणि सर्व राज्यांची सरकारही पूर्ण लक्ष देत आहेत. यासाठी कठोर कायदेही करण्यात आले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना सध्याच्या मोटार वाहन कायद्यानुसार शिक्षा केली जाते. दंड आकारण्यापासून तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. 

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सामान्यतः लोकांना दंड आकारला जातो. पण, याचा अर्थ असा नाही की, त्यांना तुरुंगात टाकता येणार नाही. असे अनेक वाहतूक नियम आहेत, ज्यांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास भोगावा लागतो. त्यामुळे प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. पण, इथे आणखी एक मुद्दा येतो की, ज्याप्रमाणे इतर कोणत्याही व्यक्तीची चूक असू शकते, तशीच चूक वाहतूक पोलिसांचीही असू शकते. जर समजा वाहतूक पोलिसांनी चुकून तुमचे चलान कापले असेल तर त्याचा अर्थ असा नाही की, आता तुम्हाला त्या चलानचा दंड भरावा लागेल.यामध्ये अशीही तरतूद आहे की, जर एखाद्या वाहतूक पोलिसाने चुकून तुमचे चलान कापले आणि तुम्ही वाहतुकीच्या कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी संबंधित विभागाशी संपर्क साधू शकता. तुम्ही वाहतूक पोलिस विभागाच्या उच्च अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता आणि सांगू शकता की, तुम्ही वाहतूक नियमाचे उल्लंघन केले नाही, तुमचे चलान चुकीच्या पद्धतीने कापले गेले आहे. जर त्यांना तुमची तक्रार योग्य वाटली तर तुमचे चलान रद्द केले जाईल. तुम्ही तुमच्या शहरातील वाहतूक पोलीस विभागाच्या कार्यालयात जाऊन हे करू शकता. याशिवाय तुमचे चलान रद्द झाले नाही तरी तुम्ही चालानला न्यायालयात आव्हान देऊ शकता.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसTrafficवाहतूक कोंडी