शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

'तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा', एकतर्फी प्रेमातून तरुणाने कापले तरुणीचे ओठ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 5:35 AM

Crime News : या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भिवंडी : एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने साथीदाराच्या मदतीने चाकूने तरुणीचे ओठ कापल्याची घटना उघड झाली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्तार अब्दुल रहीम अंसारी (२३) व शाहीद अशी गुन्हा दाखल झालेल्या तरुणांची नावे आहेत. मुक्तार याचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. एक वर्षांपासून मुक्तार हा पीडित तरुणीला त्रास देत होता. मात्र मुलीचा या प्रेमाला विरोध होता. ही मुलगी आपल्या प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने मुलीस अनेकदा धमक्याही दिल्या होत्या.नऊ एप्रिलला पीडित तरुणी सकाळी घराबाहेर पडली असता मुक्तार व त्याच्या साथीदाराने तिला गाठले. त्यावेळी मुक्तारच्या साथीदाराने मुलीला जबरदस्तीने पकडून ठेवले व मुक्तारने चाकूने मुलीच्या ओठांवर वार करत ओठ कापले. जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी सुरुवातीला शहरातील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले. मात्र ओठांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्याने डॉक्टरांनी तिला केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. सध्या तिच्यावर या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी मुक्तार व शाहीद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा''मुक्तारचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तू मेरी नही हुई तो, मैं तुझे किसी और के लायक नही छोडूंगा, अशी धमकीही त्याने दिली होती. प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने अनेकदा धमक्याही दिल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी