उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमधून आईच्या नात्याला काळिमा फासणारी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे प्रेम प्रकरणात अडथळा ठरत असलेल्या पाच वर्षाच्या मुलीची तिच्याच आईने हत्या केली आणि नंतर तिचा मृतदेह विहिरीत फेकला. यादरम्यान आरोपी महिला मोठ्या आरामात आपल्या सासरी राहत होता. पण मुलीबाबत तिने कुणाला काहीच सांगितलं नाही. जेव्हा पत्नीने पुन्हा पुन्हा मुलीबाबत विचारले तर तिने नेहमी टोलवा टोलवीची उत्तरे दिली. यादरम्यान सासरच्या लोकांना संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिली.
ही घटना डलमऊ भागातील सुरसना गावातील आहे. आरोपी महिलेचं लग्न बलभद्रपूर गावातील संतोष कुमारसोबत झालं होतं त्यांना एक पाच वर्षांची मुलगीही होती. या मुलीला घेऊन महिला होळीआधी माहेरी गेली होती. ती ३१ मार्चला पुन्हा सासरी परत येणार होती. पण ती आली नाही. नंतर सासरच्या लोकांनी तिचा शोध घेतला. पण काही पत्ता लागला नाही. (हे पण वाचा : बॉयफ्रेन्डसोबत हॉटेलवर मजा मारायला गेली होती पत्नी, अचानक पती समोर आला आणि मग....)
महिलेच्या सासरच्या लोकांना कुणीतरी सांगितले की, ती दिबियापूर गावातील तिच्या प्रियकरासोबत त्याच्या घरात राहत आहे. जेव्हा ती पुन्हा सासरी परतली तेव्हा तिच्यासोबत मुलगी नव्हती. नंतर सासरच्या लोकांनी मुलीचा शोध घेत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी जेव्हा शोध सुरू केला तेव्हा मुलीचा मृतदेह बलभद्रपूर गावापासून ५०० मीटर दूर विहिरीत सापडला.
मुलीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली. माहिती मिळताच एसपी, सीओ आणि फॉरेन्सिक टीम तिथे पोहोचली. जेव्हा पोलिसांनी मुलीच्या आईची चौकशी केली तेव्हा तिने सांगितले की, तिचं वर्षभरापासून एका व्यक्तीसोबत प्रेम प्रकरण सुरू आहे आणि ती दोन दिवसांपासून त्याच्यासोबत राहत होती.
त्यासोबतच आरोपी महिलेने सांगितले की, तिची पाच वर्षांची मुलगी वडिलांना माझ्या प्रेम प्रकरणाबाबत सांगण्याबाबत बोलत होती. त्यामुळे मी माझ्या प्रियकरासोबत मिळून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. जेणेकरून आमच्या प्रेम प्रकरणाबाबत कुणाला काही कळू नये. (हे पण वाचा : 'मला फक्त मित्र म्हणून राहायचंय', असं बोलला, म्हणून तरूणीनं शेअर केले न्यूड फोटो अन् मग....)
रायबरेलीचे एसपी श्र्लोक कुमार यांनी सांगितले की, मुलीचा मृतदेह विहिरीतून काढून पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. तेच मुलीच्या वडिलांची स्थिती रडून फारच खराब झाली आहे. त्याने कधी विचारही केला नसेल की, त्याची पत्नी स्वत:च्या मुलीसोबत असं करेल.