महाराष्ट्रातील पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधातून 5 जणांनी मिळून तरुणाची हत्या केली. यासोबतच मृतदेहाचे हात-पाय बांधून पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील नीरा नदीत फेकण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना आहे. बारामती डीवायएसपी गणेश इंगळे यांनी सांगितले की, मृत विकास पाखरे हा टेम्पो चालक होता. तो दररोज बारामती ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे जनावरांचे खत घेऊन जात असे. पोलिसांनी सांगितले की, मृताचे एका आरोपीच्या बहिणीशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे 10 जून रोजी ही हत्या करण्यात आली.12 जून रोजी स्थानिकांनी विकासचा मृतदेह नदीत आढळला असता एकच खळबळ उडाली होती. याची माहिती स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. वालचंदनगर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून तपास सुरू केला. हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता.४८ तासांत मृतदेहाची ओळख पटली. या प्रकरणी मृताच्या भावाने ५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून दोन आरोपींचा शोध सुरू आहे. त्याचवेळी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
बहिणीशी अनैतिक संबंध, भावाने हातपाय बांधून टेम्पो चालकाचा मृतदेह नदीत फेकला; असे उघडले रहस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 12:32 PM