मुंबई - विविध गुन्ह्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आता शेती करण्यासाठी अद्यावत उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. जेलमधील आधुनिक कृषीसाठी लागणारी अवजारे १७ लाख ४८ हजाराची अवजारे खरेदी करण्यात येणार आहे.कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध प्रकारची कामे लावली जातात. त्यामध्ये तुरुंगाच्या मालकीतील विर्स्तीण भूखंडावर विविध प्रकारची पिके घेतली जातात. नांगरणीपासून ते पेरणी, लागवडीची सर्व कामे कैद्यांकडून करण्यात येतात. त्यांना या कामाच्या मोबदल्यात मेहनताना दिला जातो. मात्र जेलमधील शेतीची पद्धती पूर्वीच्या जुन्या अवजाराने केली जात होती. आधुनिक शेतीसाठी लागणारी अद्यावत उपकरणाचा अभाव असल्याने पिकाच्या उत्पादनावर मर्यादा येत होत्या. त्यामुळे नवीन उपकरणे खरेदीसाठी गृह विभागाकडून १७ लाख ४८ हजार रुपयांची नुकतीच मान्यता मिळाली आहे. येरवडा, कोल्हापूर येथील मध्यवर्ती जेलसह परभणी, अमरावती, भंडारा आदी अकरा ठिकाणी उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती कारागृहातील सूत्रांकडून देण्यात आली.
कारागृहात शेतीसाठी कैद्यांना मिळणार अद्ययावत उपकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2019 8:50 PM
आधुनिक कृषीसाठी लागणारी अवजारे १७ लाख ४८ हजाराची अवजारे खरेदी करण्यात येणार आहे.
ठळक मुद्देकारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना विविध प्रकारची कामे लावली जातात. नवीन उपकरणे खरेदीसाठी गृह विभागाकडून १७ लाख ४८ हजार रुपयांची नुकतीच मान्यता मिळाली आहे. येरवडा, कोल्हापूर येथील मध्यवर्ती जेलसह परभणी, अमरावती, भंडारा आदी अकरा ठिकाणी उपकरणे पुरविण्यात येणार आहेत. अशी माहिती कारागृहातील सूत्रांकडून देण्यात आली.