गेल्या काही दिवसापूर्वी कोलकाता येथे एका महिला डॉक्टरवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. आता एका आठवड्यातच बंगळुरू येथून एक अशीच घटना समोर आली आहे. बंगळुरूमध्ये, रविवारी पहाटे एका अज्ञात मोटरसायकलस्वाराने एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. ही मुलगी शहरातील एका महाविद्यालयाची अंतिम वर्षाची विद्यार्थिनी होती आणि कोरमंगला येथे एका कार्यक्रमानंतर हेब्बागोडी येथील तिच्या घरी परतत होती. ज्या व्यक्तीकडून तिने लिफ्ट घेतली होती, त्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही तरुणी कोरमंगला येथे एका कार्यक्रमाला गेली होती. लिफ्ट देणाऱ्या मुलाला संशयित आरोपी म्हणून अटक केले आहे. तिला लिफ्ट देणाऱ्या व्यक्तीवर बलात्काराचा संशय असून चौकशी सुरू आहे.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर बहिणीने घराबाहेर काढले, 6 नराधमांनी केला सामूहिक अत्याचार…
पोलिसांनी सांगितले की, पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले होते आणि त्यांनी पीडिता आणि तिच्या नातेवाईकांशी बोलले आहेत. आम्ही सर्व माहिती गोळा केली असून पाच टीम तयार केल्या आहेत. आम्ही तपास करत असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल.
कोलकात्यात महिला डॉक्टरची हत्या
कोलकात्याच्या आरजी कार रुग्णालयात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याप्रकरणी पोलिसांनी आरोपी डॉक्टर संजय रॉयला अटक केली आहे. या घटनेचा देशभरात निषेध नोंदवला जात आहे. मात्र बुधवारी रात्री या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं. रात्री उशिरा अज्ञातांनी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची तोडफोड केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ मध्यरात्री ही तोडफोड झाल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी फेसबुकवर दंगलखोरांचा फोटो शेअर केली आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांकडून माहिती मागवली आहे. दुसरीकडे, तोडफोड करणारे एवढे आक्रमक झाले होते की पोलिसांवर लपून राहण्याची वेळ आली.
आरजी कार हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीदरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत. शेकडो लोकांचा जमाव हॉस्पिटलमध्ये कसा घुसला, गोंधळ घातला आणि डॉक्टरांना लक्ष्य कसे केले, हे या व्हिडिओंमध्ये दिसून आले. ४० लोकांचा एक गट हॉस्पिटलच्या आवारात घुसला. त्यांनी मालमत्तेचे नुकसान केले आणि पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या वापराव्या लागल्या. मात्र तरीही जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.