आरा - बिहारमध्ये निर्दयी आईच्या अनैतिक संबंधाची शिक्षा तिच्या अडीच वर्षाच्या चिमुकल्याला भोगावी लागत आहे. आई तिच्या प्रियकराची हत्याकांडातील आरोपी आहे. या गुन्ह्यात आईसह चिमुकल्यालाही जेलमध्ये राहावं लागणार आहे. बिहारच्या सोहरा गावातील ही घटना आहे.
माहितीनुसार, मागील सोमवारी विवाहित महिला रुबी हिला लपून भेटण्यासाठी तिचा प्रियकर चंदन तिवारीला आला होता. त्यावेळी प्रियकर आणि महिलेला नको त्या अवस्थेत पाहून पती राजू पासवान आणि सासरच्या मंडळींनी युवकाची मारहाण करून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रेयसी महिला रुबी देवी, तिचा पती राजू पासवान, सासरे बहादूर पासवान, दिर सचिन पासवानला अटक केली. या प्रकरणी कोर्टाने सर्व आरोपीला कोठडी सुनावली. त्यात आरोपी महिलेसह तिच्या अडीच वर्षाच्या मुलालाही विनाकारण जेलमध्ये राहावं लागणार आहे.
महिला ९ महिन्याची गर्भवतीचिमुकल्याला माहितीही नाही तो ज्या कोठडीत आईच्या उराशी कवटाळून चाललाय त्यात त्याची काहीच चूक नाही. आरोपी महिला ९ महिन्याची गर्भवती असल्याचं सांगितले जात आहे. जी काही दिवसांनी त्याच कोठडीत आणखी एका बाळाला जन्म देणार आहे. पोलिसांनी जेव्हा आरोपी रुबीदेवीला चौकशीसाठी नेले तेव्हा तिने मृतक चंदनसोबत प्रेमसंबंध असल्याचं अमान्य केले. चंदन आणि तिच्या नवऱ्यामध्ये काही कारणामुळे वाद होते. दोघे एकमेकांशी भांडत होते. त्यावेळी चंदनने पतीवर शस्त्राने वार केला. चंदनचा मृत्यू कसा झाला याबाबत माहिती नसल्याचं तिने सांगितले.
तर पोलीस तपासात महिला आणि चंदन तिवारी यांच्यात अनैतिक संबंध होते असं अधिकाऱ्यांनी म्हटलं. चंदन तिवारी हा शाहपूरचा रहिवासी होता. त्याची हत्या प्रेम संबंध आणि प्रेयसीच्या पतीने, सासऱ्याने मारहाण केल्यानं झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी महिला रुबीदेवीसह ४ जणांना अटक केली. आरोपी महिला आणि चंदन तिवारी यांच्यात संबंध होते. दोघे एकमेकांना लपून भेटायचे. सोमवारी चंदन त्याच्या प्रेयसीला भेटायला आला असताना सासरच्यांनी दोघांना एकत्रित पाहिले तेव्हा संतापलेल्या पती, सासरे, दिराने हे कृत्य केले अशी माहिती पोलिसांनी दिली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"