जमुई - बिहारमध्ये एक रॉंग नंबरवाली लव्ह स्टोरी समोर आली आहे. जमुई जिल्ह्यातील एका युवकाचा एकदा चुकून उत्तर प्रदेशातील कानपूर इथं कॉल लागला. कॉलवर दुसऱ्या बाजूला एक युवती होती. या दोघांमध्ये बोलणं सुरू झाले. त्यानंतर व्हॉट्सअप, फेसबुक चॅटिंगही झाले. दोघेही एकमेकांसाठी अनोळखी होते, एका कॉलवरून सुरु झालेला त्यांचा प्रवास आधी मैत्री त्यानंतर प्रेमात बदलला.
या प्रेमात युवती इतकी बुडाली की तिने तिचे घर सोडून प्रियकर विकास कुमारसोबत पळून बिहारला गेली. त्यानंतर घुटिया गावात पोहचून त्यांनी लग्न केले. लग्नानंतर प्रियकर विकास कुमार नोकरीच्या निमित्ताने केरळला गेला. दुसरीकडे कानपूर इथं युवतीच्या घरच्यांनी मुलीचं अपहरण झाल्याचा संशय व्यक्त करत पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी घरच्यांनी युवकाबद्दल सांगितले. यूपी पोलिसांनी तपासाला सुरुवात करत युवतीच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ट्रेस केरे. त्यानंतर पोलीस जमुईच्या झाझा इथे पोहचले.
पोलिसांनी सांगितलं संपूर्ण प्रकरण...
झाझा येथे पोहचताच यूपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना हे प्रकरण सांगितले. त्यानंतर घुटिया गावात पोहचून पोलिसांनी अल्पवयीन मुलीला संरक्षणात पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीच्या वडिलांनी २१ मे रोजी अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर पोलीस या प्रकरणाचा छडा लावत होती. काही दिवसांपूर्वी पोलिसांना युवती झाझा पोलीस स्टेशन हद्दीतील घुटियाचा रहिवासी विकास कुमारच्या घरी असल्याचं कळालं. स्थानिक पोलिसांच्या मदतीने ५ महिन्यांनी या युवतीला सुरक्षित ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान, या प्रकरणी तपासात युवतीला झाझा पोलीस स्टेशनने चौकशीसाठी आलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. विकास कुमार नावाच्या घरी ती राहत होती. विकासने या मुलीला तिच्या घराजवळूनच घेऊन पळाला होता. त्यानंतर दोघांनी लग्न केले. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून मुलीच्या जबाबानंतर पोलीस पुढील कार्यवाही करणार आहेत असं पोलीस अधिकारी संजय कुमार सिंह यांनी सांगितले.