एका घटस्फोटाच्या प्रकरणात सगळ्यांनाच धक्का बसला जेव्हा पतीने पत्नीबाबत काही गोष्टी उघड केल्या. या दोघांच्या लग्नाला १६ वर्ष झाली. त्यांना ४ मुली आहेत. परंतु या चारही मुलींचे खरे वडील अन्य व्यक्ती आहे हे कळाल्यावर पती हैराण झाला. पत्नी त्याचा विश्वासघात करत होती. पतीने याबाबत कोर्टात पुरावेही दाखल केले. हे प्रकरणी चीनच्या जियांग्शी प्रांतातले असून मागील डिसेंबर महिन्यात कोर्टात या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली होती.
चेन जिशियान नावाच्या या व्यक्तीने पत्नीविरोधात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. साऊथ चायना पोस्टनुसार, चेन आणि त्याच्या वकिलांनी काही पुरावे कोर्टात सादर केले. ज्यात चेनच्या पत्नीने नोव्हेंबर महिन्यात तिच्या राहत्या घरी एका मुलीला जन्म दिला. हॉस्पिटलच्या दस्तावेजाची पडताळणी केली असता तिच्या डिलिवरीवेळी वू नावाचा व्यक्ती समोर आला. याच व्यक्तीसोबत पत्नीचे अफेअर सुरू आहे असा संशय चेनला आधीपासून होता. त्यानंतर या प्रकरणाची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. चेनच्या घरी २००८, २०१० आणि २०१८ या साली आधी ३ मुलींनी जन्म घेतला होता.
आधीच्या ३ मुलींचा पिताही वू हाच होता. चेन आणि त्याच्या पत्नी २०२२ पासून वाद सुरू झाला होता. पत्नी आपला विश्वासघात करतेय हे चेनला कळाले होते. फेब्रुवारीपासून त्याने पत्नीचा पाठलाग सुरु केला. एका रात्री त्याची पत्नी वू या व्यक्तीसोबत हॉटेलमध्ये जाताना दिसली. सर्वात लहान मुलगी ही आपली नाही असा संशय चेनला आला होता. कारण ती दिसायला अजिबात चेनसारखी नव्हती. त्याने तिचा डिएनए टेस्ट केला. जेव्हा या मुलीचा डिएनए रिपोर्ट समोर आला तेव्हा तो वाचून चेनला धक्काच बसला. ती मुलगी चेनची नाही हे त्याला माहिती पडले.
ही गोष्ट चेनने त्याच्या सासरी जाऊन सासूला सांगितली तेव्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी सासू खाली पडली. त्यानंतर भडकलेली पत्नी चेनच्या आई वडिलांशी भांडायला गेली. तेव्हा चेनच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे पती पत्नी यांच्यातील वाद आणखी तापला. चेनने पत्नीला मुलींच्या खऱ्या वडिलांबाबत विचारले. तर तिने बोलणे टाळले. कोर्टात या प्रकरणी चेनला सर्व मुलींचे पालकत्व पत्नीला द्यावे आणि मुलींच्या देखभालीसाठी केलेला खर्च परत करावा अशी मागणी केली. तर जी मुले इतकी वर्ष तुम्हाला वडील मानतात त्यांची डीएनए चाचणी करणे क्रूर आहे. मी विश्वासघात केलाय वाटत नाही. रक्ताचे नातेच सर्वात महत्त्वाचे असते का? असा सवाल तिने कोर्टात विचारला. सध्या या प्रकरणाची सुनावणी कोर्टात सुरू आहे.