शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
3
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
4
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
5
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
6
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
7
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
8
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
9
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
10
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
11
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

‘‘लवली मर गई है , जाकर देखो’’; दारूच्या नशेत केला मुलीचा खून, बापाला अटक

By प्रशांत माने | Published: September 25, 2023 1:30 PM

गतीमंद मुलीचा गळा आवळून केला खून; दारूच्या नशेत नेहमी करायचा मारहाण

डोंबिवली: बापाने १० वर्षीय गतिमंद मुलीची गळा आवळून खून केल्याची मन हेलावून टाकणारी घटना पुर्वेकडील मानपाडा, माणगाव परिसरातील हरि म्हात्रे चाळीत रविवारी रात्री घडली. लवली मनोज अग्रहारी असे मृत मुलीचे नाव आहे. मनोज (वय ३८) या निर्दयी बापाला मानपाडा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबत मुलीची आई लिलावती हिने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

लिलावती या बाहेर घरकाम करतात त्यांना चार मुली आहेत. एक मुलगी गावी तिच्या आजीकडे राहते. तर इथे तीन मुली राहतात. तीचा पती आरोपी मनोज हा एका किराणा स्टोअरमध्ये मालाची डिलेव्हरीचे काम करतो. त्यांची दुस-या क्रमांकाची मुलगी लवली ही जन्मापासून गतीमंद होती तिला बोलता व ऐकूही येत नव्हते. तिच्यावर उपचार करूनही कोणताही फरक पडत नव्हता. मनोजला दारूचे व्यसन होते. तो दररोज दारू पिऊन पत्नी लिलावती आणि चारही मुलींना मारझोड करायचा. लवली हिला मारहाण करताना हिचा तर काहीच उपयोग नाही, हिला एकदाचे कायमचे संपवावे लागेल असे नेहमी बोलायचा. मागील आठवडयात देखील त्याने घरात कोणी नसताना लवलीला मारहाण केली होती. यात तिच्या कमरेला दुखापत झाली होती.

रविवारी संध्याकाळी पत्नी लिलावती घरकाम करण्यासाठी बाहेर गेली होती. तर मोठी मुलगी कोमल (वय १४) ही देखील कामानिमित्त बहिण तनु (वय ४) हिला घेऊन बाहेर गेली होती. त्यावेळी घरात कोणी नाही हे पाहून मनोजकुमारने घरात असलेल्या लवलीचा कशानेतरी गळा आवळून खून केला आणि तो पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या मानपाडा पोलिसांनी मनोजचा आजुबाजुच्या परिसरात शोध घेत त्याला बेडया ठोकल्या आहेत.

‘‘लवली मर गई है , जाकर देखो’’

आरोपी मनोजची मोठी मुलगी कोमल एका भंगार दुकानात साफसफाईचे काम करते. लवलीचा खून केल्यावर घराबाहेर पडलेला मनोज तिच्या कामाच्या ठिकाणी गेला. लवली मर गई है, जाकर देखो असे तिला बोलून पसार झाला. कोमलने लागलीच घर गाठले असता लवली निपचित पडल्याचे तीच्या निदर्शनास पडले. तीने हिची माहीती आई लिलावतीला दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी