इटावा - शहरात एका अज्ञात मृतदेहाची ओळख आणि अंत्यसंस्कार करण्याच्या घटनेत नवा ट्विस्ट आला आहे. हॉस्पिटलच्या शवागृहातून मृतदेह घेऊन जाणारे लोक बनावट होते. बोगस कागदपत्रांच्या आधारे मृतदेह ताब्यात घेणाऱ्यांपैकी ५ जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी पोलीस कारवाई करत आहे. सुंदरपूर रेल्वे फाटकाशेजारी ट्रेनच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह अज्ञात असल्याने पोलिसांनी तो शवागृहात ठेवला. एखाद्या मृतदेहाची ओळख न पटल्यास ७२ तासांसाठी मृतदेह जपून ठेवला जातो.
परंतु या प्रकरणी दुसऱ्या दिवशी ३ लोकांनी मृतदेहावर दावा सांगितला. मृतकाची ओळख अतुल कुमार अशी होती. तिघांनी अतुल कुमारचा भाऊ, वडील म्हणून आधार कार्ड जमा केले. त्यानंतर मृतदेह घेऊन जात त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र यानंतर पुढल्या दिवशी मृतदेहाचे खरे नातेवाईक समोर आले. तेव्हा पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपासाला सुरुवात केली. तपासात ज्या लोकांनी मृतदेह घेऊन गेले त्यांचे आधार कार्ड नंबर आणि फोन नंबरही बनावट असल्याचे आढळलं. या तपासात ५ लोकांना अटक केली, त्यात एक मुलगी मुस्कान कोस्टा, तिचा प्रियकर हेतराम मित्तल, सहकारी फारुक, तसलीम आणि फुरकान यांना पोलिसांनी पकडले.
५० वर्षीय हेतराम मित्तल त्याच्या पत्नीपासून त्रस्त होता. त्याला २२ वर्षीय प्रेयसी मुस्कान कोस्टासोबत लग्न करायचं होते. मुस्कान आणि हेतराम यांची ओळख ५ वर्षापूर्वी झाली. तेव्हा मुस्कानच्या आई वडिलांनी हेतरामविरोधात अल्पवयीन मुलीला फसवून गायब केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर हेतरामने षडयंत्र रचत प्रेयसीच्या आई वडिलांना फसवण्यासाठी शवागृहातून अज्ञात मृतदेह अतुल कुमार सांगून त्याला मुस्कानचा पती सांगावा. त्यानंतर बहाण्याने प्रेयसीच्या आई वडिलांवर हत्येचा आरोप करून त्यात त्यांना अडकवत प्रेयसी मुस्कानसोबत लग्न करण्याचं प्लॅनिंग केले.
षडयंत्रानंतर हेतरामची पत्नी शिखा अग्रवाल हिचीही दिशाभूल करण्यात आला. मुस्कानचे लग्न अतुल कुमारसोबत झालंय. हे खरे दाखवण्यासाठी आणि मुस्कानच्या आई वडिलांना खोट्या हत्येच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी अतुल कुमारच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या षडयंत्रात फारूक, तसलीम आणि फुरकान यांनीही साथ दिली. बनावट आधार कार्ड बनवून यांना अतुल कुमारचे नातेवाईक म्हणून समोर आणले. मात्र अतुल कुमार नावाचा कुठलाही व्यक्ती नव्हता. हा केवळ काल्पनिक बनाव रचण्यात आला होता. दरम्यान, हेतराम मलासारखी मारहाण करायचा. मला दोन मुले आहेत. पती मला आणि माझ्या मुलांना मारण्याची धमकी द्यायचा. माझ्या आईवडिलांचे निधन झालंय. हेतरामनं यापूर्वीही २ लग्न करून पत्नीला सोडून दिलंय. मुलगी आणि पैशासाठी हेतराम काहीही करू शकतो असा दावा हेतरामची पत्नी शिखाने केला आहे.