शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

आणखी एक श्रद्धा..! अनैतिक संबंधातून महिलेची हत्या; मृतदेहाचे तुकडे केले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 9:04 AM

अनुराधा ही व्याजावर पैसे देण्याचे काम करायची. चंद्रमोहनने अनुराधाकडून २०१८ मध्ये ७ लाख रुपये घेतले होते

हैदराबाद - देशभरात चर्चेत आलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडासारखा आणखी एक प्रकार हैदराबादमध्ये समोर आला आहे. याठिकाणी एका व्यक्तीने गर्लफ्रेंडची चाकू मारून हत्या केली. त्यानंतर दगड कापणाऱ्या मशीन खरेदी करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. शिर वेगळे करत ते पॉलिथीन पिशवीतून ते फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर त्याने मृतदेहाचे तुकडे कचरा कुंडीत फेकले. कुठलाही पुरावा राहू नये यासाठी त्याने घर स्वच्छ करत साफसफाई केली. इतकेच नाही तर मृत युवतीच्या फोनवरून तिच्या ओळखीच्यांना मॅसेज केला जेणेकरून ती जिवंत आहे आहे असं वाटावे. हे प्रकरण उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली. 

१७ मे रोजी सुधाकर नावाच्या सफाई कर्मचाऱ्याला कचरा डंपिग जागेवर काळ्या रंगाच्या पॉलिथीनमध्ये महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. ही माहिती त्याने पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी तपासणी केली असता हा मृतदेह येरम अनुराधा रेड्डी या महिलेचा असल्याचे कळाले. अनुराधा ५५ वर्षाची होती. तिचे ४८ वर्षीय चंद्रमोहनसोबत १५ वर्षापासून अनैतिक संबंध होते. अनुराधाच्या पतीने खूप आधीच तिला सोडून दिले. तेव्हापासून ती चंद्रमोहनच्या घरीच राहायची. 

अनुराधा ही व्याजावर पैसे देण्याचे काम करायची. चंद्रमोहनने अनुराधाकडून २०१८ मध्ये ७ लाख रुपये घेतले होते. अनुराधा चंद्रमोहनकडे हे पैसे परत मागत होती. परंतु तो तिला पैसे देत नव्हता. अनुराधाकडून पैशासाठी होणारा दबाव पाहता यातून दोघांमध्ये सातत्याने वाद व्हायचा. त्यामुळे चंद्रमोहनने अनुराधाचा काटा काढण्याचे ठरवले. १२ मे रोजी या दोघांमध्ये वाद झाला. यावेळी चंद्रमोहनने अनुराधावर चाकूने हल्ला करत तिचा जीव घेतला. 

अनुराधाची हत्या करून चंद्रमोहनने तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे ठरवले. सुरुवातीला त्याने दगड कापणारी मशीन आणली त्याने मृतदेहाचे शिर वेगळे केले. त्यानंतर मृतदेहाचे अनेक तुकडे केले. शिर फ्रिजमध्ये ठेवले तर इतर मृतदेहाचे तुकडे सुटकेसमध्ये ठेवले. १५ मे रोजी त्याने रिक्षाच्या मदतीने कचऱ्याच्या डंपिगग्राऊंडमध्ये हे तुकडे फेकले. आरोपीने फिनाईल, डेटॉल, परफ्यूम, अगरबत्ती आणि स्प्रेचा वापर करत मृतदेहाचा वास पसरू नये याची खबरदारी घेतली. मात्र कचरा डंपिगग्राऊंड येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला हे तुकडे सापडले तिथून ही संपूर्ण घटना उघडकीस आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी