शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
4
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
5
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
6
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
7
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
8
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
9
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
11
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
13
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
14
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
16
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
17
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
18
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
19
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा

पोलिसांचा धाक संपला, भरदिवसा दोन कारच्या काचा फोडून पैशांच्या बॅग लांबविल्या

By सागर दुबे | Published: April 17, 2023 8:55 PM

चो-यांचे सत्र थांबेना ; एकूण ८७ हजार रूपयांचा ऐवज चोरी

जळगाव :  जळगाव शहरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले चोऱ्या व घरफोड्याचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. रात्री नव्हे तर आता भरदिवसा घरफोड्या आणि चो-यांच्या घटना समोर येत आहेत. सोमवारी भरदिवसा शहरातील चित्रा चौक आणि मणियार सुपर शॉपीसमोर उभ्या असलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी पैशांच्या बॅगा लांबविल्याच्या घटना घडल्या. यामुळे पोलिसांचा उरला सुरलेला धाक संपल्याची प्रचिती जळगावकरांना येत आहे.

शिरपूर तालुक्यातील हिसाळे येथील जितेंद्र शालीग्राम भदाणे यांचा गावातच खते व बी-बियाणे विक्रीचा व्यवसाय असून त्यावर त्यांचा उदनिर्वाह चालतो. सोमवारी सकाळच्या सुमारास भदाणे हे त्यांचा मित्र गणेश नवल पाटील (रा. वडगाव ता. जळगाव) यांच्यासोबत (एमएच.१८.बीसी.०२५७) क्रमांकाच्या कारने जामनेर येथे जाण्यासाठी निघाले होते. दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास भदाणे यांनी यांनी कार चित्रा चौकातील रिक्षा स्टॉपजवळ पार्क करून जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले. जेवण आटोपल्यानंतर १.१५ वाजेच्या सुमारास भदाणे हे पुढच्या प्रवासाला जाण्यासाठी कारजवळ आले असता, त्यांना कारच्या मागील बाजूच्या दरवाजाच्या खिडकीची काच फोडलेला दिसून आला. तर कारच्या मागच्या सीटवर ठेवलेल्या १० हजार रूपये ठेवलेली बॅग दिसून आली नाही. त्यामुळे त्यांना चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.----

काही मिनिटात दुसरी घटना...रोकड, दागिने नेले...दुसर्‍या घटनेत जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील अमोल कारभारी पाटील हा तरुण सोमवारी सकाळी एमएच.४८.पी.९७१० क्रमांकाच्या कारने बहिणीच्या वैद्यकीय तपासणीसाठी जळगावात आला होता. बहिणीची सासू व सासरे हे आडगाव येथून बसने नवीन बसस्थानक येथे उतरले होते. त्यामुळे त्यांनाही सोबत घेवून अमोल हा खासगी रूग्णालयात गेला होता. रूग्णालयातील काम आटोपून दीड वाजेच्या सुमारास ते ड्रायफ्रुट घेण्यासाठी स्टेडीयम परिसरातील मणियार सुपर शॉपीमध्ये आले होते.

दुकानाच्या बाजूलाच अमोल याने कार पार्क केली होती. मात्र, खरेदी करून बाहेर आल्यानंतर त्यांना कारची मागची काच फोडलेली दिसून आली. तर मागच्या सीटवर ४५ हजार रूपयांची रोकड, २५ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी आणि मोबाईल असलेली बॅग व दुसरी महत्वाचे कागदपत्र असलेली बॅग गायब झालेली दिसून आली. आजू-बाजूला त्यांनी बँगचा शोध घेतला. पण, बॅग चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात येवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असून सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे.