शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
6
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
7
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
8
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
9
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
10
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
11
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
12
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
13
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
14
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
15
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
16
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
17
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
18
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
19
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
20
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव

अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 11:05 PM

महिला भूमी अभिलेख उपअधीक्षकांच्या अंगावरही ओतले डिझेल, तीन जणांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

कोरेगाव : साठेवाडी, ता. कोरेगाव येथील घरकुलाच्या जागेची मोजणी करून द्यावी. या मागणीसाठी उत्तम मोरे याने स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच भूमी अभिलेखच्या उपअधीक्षक लता घरात यांच्या अंगावर डिझेल ओतून ढकलून दिले.  याप्रकरणी उत्तम मोरे याच्यासह तीन जणांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा व जिवे मारण्याच्या प्रयत्न प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साठेवाडी, ता. कोरेगाव येथे मुक्ताबाई दादा मोरे यांना रमाई आवास योजनेतून घरकूल मंजूर झाले आहे. या घरकुलासाठी दिलेल्या शासकीय जागेची मोजणी करण्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयास पत्रव्यवहार केला होता. मात्र, या कार्यालयाकडून संबंधित जागेचा सातबारा उतारा व लेआउट पाहिल्यानंतर कमी- जास्त पत्रक झाले नसल्याने मोजणी करता येणार नसल्याबाबतचे पत्र गटविकास अधिकारी कार्यालयात दिले होते. त्याचबरोबर कमी- जास्त पत्रक झाल्याशिवाय मोजणी करता येणार नसल्याचेही कळविले होते.

भूमी अभिलेख उपअधीक्षक लता घरत या पावणेतीन वाजेच्या सुमारास आपल्या दालनातून बाहेर पडत असताना उत्तम मोरे हे दालनामधील खुर्चीवर जाऊन बसले. घरत यांनी मी न्यायालयात साक्ष देण्यासाठी चालले आहे, तेथून आल्यानंतर तुमच्याशी बोलते असे सांगून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. मात्र, उत्तम मोरे याने मुक्ताबाई मोरे यांच्या कामाचा काय तो आत्ताच्या आता निकाल लावा, असे म्हणत शिवीगाळ करत डिझेल स्वतःच्या अंगावर ओतून घेतले व घरत यांच्या अंगावर टाकून ढकलून दिले. त्यानंतर खिशातील काडीपेटी काढून मी स्वतःला पेटवून घेतो, असे म्हणू लागला. त्यामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली.

तिघांविरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हाभूमी अभिलेख उपअधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कोरेगाव पोलिस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुक्ताबाई दादा मोरे, उत्तम व्यंकट मोरे आणि सुमित पद्माकर मोरे, तिघे रा. साठेवाडी, ता. कोरेगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक गणेश माने तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर