शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
3
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
4
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
5
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
6
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
7
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
8
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
9
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
10
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
11
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
12
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
13
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
15
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
16
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
17
"तुम्ही राजकारणाची पद्धत बदला!", शशांक केतकरची मतदानानंतरची पोस्ट चर्चेत
18
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
20
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल

‘लिव्ह इन’मधील महिलेचा प्रियकरानेच चिरला गळा; भिवंडीत दुर्गंधीनंतर घटना उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 6:53 AM

दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेशनगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली.

भिवंडी : पतीपासून वेगळे होऊन प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या ३५ वर्षीय महिलेची तिच्या घरातील किचनमध्ये गळा चिरून हत्या झाल्याची घटना कोनगाव येथील गणेशनगर श्याम बागमधील घरात सोमवारी रात्री घडली. तीन दिवसांनी परिसरात दुर्गंधी पसरल्याने हत्येची घटना उघडकीस आली आहे. 

तिच्यासोबत राहणारा प्रियकरच महिलेची हत्या करून फरार झाला आहे. याप्रकरणी  कोनगाव पोलिस ठाण्यात फरार प्रियकर शबीर (रा. अंबरनाथ) याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. मृत महिला आणि आरोपी शबीर हे अंबरनाथमधील एका कंपनीत कामाला होते. त्यावेळी दोघांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी भिवंडी तालुक्यातील कोनगाव भागात गणेशनगर येथील राजपूत निवासमधील तळ मजल्यावरील खोली भाड्याने घेतली. तेथे ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. विशेष म्हणजे हत्या झालेल्या महिलेची मैत्रीण तिच्यासोबत राहत होती.

गळा चिरल्यानंतर नसादेखील कापल्या१५ सप्टेंबरला दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले होते. भांडणात शबीरने धारदार कटरने महिलेचा गळा चिरला, तसेच दोन्ही हाताच्या नसा कापून तिला जागीच ठार मारले. त्यानंतर घराला बाहेरून कुलूप लावून शबीर त्या ठिकाणहून पळून गेला होता. मैत्रिणीच्या दिलेल्या तक्रारीवरून कोनगाव पोलिस ठाण्यात शबीर विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस पथक आरोपीच्या शोधत परराज्यात गेले असून, लवकरच त्याला ताब्यात घेऊन अटक केली जाईल, अशी माहिती कोनगाव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार यांनी दिली आहे.