शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

पतीला वश करण्यासाठी पत्नीने ज्योतिषाला दिले ५९ लाख; प्रियकरानेही दिली साथ, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 4:46 PM

या कामात महिलेचा एक्स बॉयफ्रेंड परेश याने ज्योतिष बादलला मदत केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले

मुंबई - शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या व्यावसायिक पतीला वश करण्यासाठी ज्योतिषाला ५९ लाख रुपये दिले, ही घटना पवई भागातील आहे. पोलिसांनी महिलेचा प्रियकर परेश गडा, ज्योतिषी बादल शर्मा यांच्याविरुद्ध फसवणुकीचा आणि पैसे लाटल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिषी आणि महिलेच्या बॉयफ्रेंडनं मिळून काळ्या जादूच्या नावाखाली पतीला वश करण्याचं आमिष दाखवत व्यावसायिकाच्या पत्नीकडून २४ लाख रुपयांचे सोने आणि ३५ लाख रुपयांची रोकड नेली.

सोशल मीडियाच्या माध्यमातून मी ज्योतिष बादल शर्माला भेटली होती असं ३८ वर्षीय महिलेने पोलिसांना सांगितले. ही घटना १३ ते १८ ऑक्टोबर दरम्यान घडली. या दोघांनाही लवकरच अटक करण्याचा दावा पोलीस करत आहेत. महिलेच्या पतीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, दिवाळीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी त्याने हे पैसे घरी ठेवले होते. पगार देण्याची वेळ आली तेव्हा कपाट उघडले असता त्यात ३५ लाख रुपये नव्हते.

या कामात महिलेचा एक्स बॉयफ्रेंड परेश याने ज्योतिष बादलला मदत केल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. १३ वर्षांपूर्वी जेव्हा व्यावसायिकाला पत्नीच्या अफेअरची माहिती मिळाली, तेव्हापासून दोघांमध्ये भांडण सुरू होते. यामुळे व्यथित झालेल्या व्यावसायिकाच्या पत्नीला त्याला वश करायचे होते. महिलेने पोलिसांना सांगितले की, ज्योतिष बादलने पतीला वश करण्यासाठी काळी जादू करणार असल्याचे सांगितले होते. कारण तिचा नवरा फक्त त्याच्या भावाचे आणि कुटुंबीयांचेच ऐकत असे.

या व्यावसायिकाचे म्हणणं आहे की, जेव्हा त्याने आपल्या पत्नीला या प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा तिने काहीही सांगितले नाही. बऱ्याच प्रयत्नांनंतर पती आणि दिराने विश्वासात घेऊन विचारणा केली असता सगळा प्रकार समोर आला. ते ऐकून पतीला धक्काच बसला. त्यानंतर लगेच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"