शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
5
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
6
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
7
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
8
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
9
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
10
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
11
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
12
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
13
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
14
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
15
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
16
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
17
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
18
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
19
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
20
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज

सैतानी बाप! बायकोचा बदला घेण्यासाठी तीळगुळाऐवजी मुलांना पाजले विष, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 10:09 AM

मनोजने मुलांना खाऊपिऊ घातले व जेवणात विष टाकले. त्यांचा गळा आवळण्याचादेखील प्रयत्न केला.

नागपूर :  मकर संक्रांतीच्या दिवशीच नागपुरात एका सैतानी बापाने पत्नीच्या वादाचा बदला घेण्यासाठी चक्क पोटच्या मुला-मुलीला विष दिले. यात सातवर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून, बारावर्षीय मुलगा गंभीर आहे, तर दुसरीकडे बापानेदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. 

मनोज अशोक बेले (४५), असे सैतानी बापाचे नाव आहे. त्याचा पत्नी प्रियासोबत सातत्याने वाद व्हायचा, त्यामुळे दोघेही वेगवेगळे राहायचे. सातवर्षीय तनिष्का व बारावर्षीय प्रिन्स हे आईसोबत राहायचे, तर मनोज एकटा राहायचा. पती-पत्नीने आपसात केलेल्या समझोत्यानुसार तनिष्का व प्रिन्स हे दर रविवारी वडिलांकडे जायचे. रविवारी सकाळी आजोबा राजू तल्हार यांनी दोघांना मनोजच्या घरी सोडले. मनोजने मुलांना खाऊपिऊ घातले व जेवणात विष टाकले. त्यांचा गळा आवळण्याचादेखील प्रयत्न केला. त्यानंतर मनोजने गळफास घेतला. 

वर्षभरापासून राहत होता वेगळामेकॅनिक असलेल्या मनोजला दारूचे व्यसन होते. मुलांवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी पत्नी मुलांसोबत वेगळी झाली होती. नोव्हेंबरमध्ये त्याने तनिष्काचा, तर २८ डिसेंबरला प्रिन्सचा वाढदिवस साजरा केला होता.