शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

विवाहबाह्य संबंधातून पतीच्या हत्येची मांत्रिकाला सुपारी; मुलीच्या हॉकी शिक्षकावरच जडला जीव

By सूर्यकांत वाघमारे | Published: October 06, 2023 2:51 PM

पत्नीच्या स्वभावात झालेल्या बदलामुळे पतीने घरात रेकॉर्डर लावले होते. त्यामध्ये पती घराबाहेर गेल्यावर पत्नी त्या शिक्षकासोबत बोलत असल्याचे उघड झाले.

नवी मुंबई : मुलीच्या शिक्षकावरच जीव जडल्याने पतीला मार्गातून हटवण्यासाठी मांत्रिकामार्फत हत्येचा कट रहचल्याची घटना समोर आली आहे. पतीने घरात रेकॉर्डर लावून पत्नीचा हा कट उघड केला आहे. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पत्नी व मांत्रिक विरोधात रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घणसोली परिसरात राहणाऱ्या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. त्यांची मुलगी वाशीतील एका शाळेत शिकत असून तिथे तिला हॉकी शिकवले जात असल्याने हॉकी शिक्षकाने पालकांचा व्हाट्सअप ग्रुप बनवला आहे. त्यामध्ये या व्यक्तीच्या पत्नीची त्या हॉकी शिक्षकासोबत घनिष्ट मैत्री होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध सुरु होते.

दरम्यान पत्नीच्या स्वभावात झालेल्या बदलामुळे पतीने घरात रेकॉर्डर लावले होते. त्यामध्ये पती घराबाहेर गेल्यावर पत्नी त्या शिक्षकासोबत बोलत असल्याचे उघड झाले. यामुळे पतीने पत्नीवर पाळत ठेवली असता ते दोघे कोपर खैरणेत व वाशीत एकमेकांना भेटत असल्याचेही समोर आले. यामुळे दोघांमध्ये खटके उडत असतानाच पत्नीने आपल्या हत्येची सुपारी दिली असल्याचे उघड झाले.

सदर महिला अकोला येथील एका मांत्रिकाला फोन करून पतीचे निधन व्हावे, त्याची संपत्ती आपल्याला मिळावी तसेच हॉकी शिक्षकासोबत आपले लग्न व्हावे यासाठी मंत्रोपचार घेत असल्याचे उघड झाले. यासाठी ती प्रत्यक्ष अकोला येथील गणेशपुरी महाराज या मांत्रिकाला भेटून त्याच्याकडून आणलेली पावडर आपल्याला अन्नातून दिल्याने आपली प्रकृती बिघडून काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागले असल्याचेही पतीचे म्हणणे आहे. शिवाय पत्नीने सासरी जाऊन आपल्या कुटुंबियांच्या निधनाची देखील जादूटोण्याचा आधार घेतल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. त्यानुसार महारष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत रबाळे पोलिस ठाण्यात पत्नी व मांत्रिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पत्नीला नोटीस बजावण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी सांगितले.