सोलापूर : शाळकरी मुलीला वाटेत गाठून तिच्याशी लग्नाचे आमिष दाखवून लज्जास्पद वर्तन केले. ‘तु मला खूप आवडेस ’ म्हणून व्हिडिओ कॉल, चॅटिंगसाठी मोबाईल भेट दिला. पालकाला दप्तर तपासाताना मोबाईल आढळला. पिडितेने सांगितल्यानुसार तरुणाविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमान्वये सोमवारी पहाटे गुन्हा नोंदला आहे. प्रवीण लक्ष्मीकांत आडम (वय- ३०) असे गुन्हा नोंदलेल्या आरोपीचे नाव आहे.
पिडितेच्या वडिलांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची मुलगी शहरातील एका शाळेमध्ये शिकते. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास तिच्या वडिलाकडून बॅग चेक करताना मोबाईल आढळून आला. याबद्दल पत्नीला विचारणा केली असता तिलाही याबद्दल काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर वडिलांनी पिडित मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली.
यावर तिने सदर मोबाईल वरील आरोपीने दिला असून, त्याने ‘तु मला आवडतेस’ मोबाईलवर व्हॉटस्अप चॅटिंग, मेसेज, व्हिडिओकाॅल, साधा काल करत जा’ म्हणून मोबाईल दिला. व जोराची मिठी मारली व तुझ्याशी लग्न करायचे आहे म्हणून निघून गेल्याचे’ पिडित मुलीने वडिलांना सांगितले.
जेलरोड पोलिसात फिर्यादीनुसार गुन्हा नोंदताच पोलीस निरीक्षक बिराजदार, महिला फौजदार तळे यांनी सोमवारी पहाटे पिडितेशी, तिच्या पालकांची भेट घेतली. पुढील तपास महिला फौजदार तळ्य करीत आहेत.