शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

न्यायालयाने तो आदेश दिल्यानं आम्ही कारवाई करु शकत नाही; पोलीस अधिक्षकांचं स्पष्टीकरण!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 7:38 PM

सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली. 

गेल्या काही दिवसांआधी जुळ्या बहिणींनी एकाच युवकाशी लग्न केल्याची मोठी चर्चा झालेली पाहायला मिळाली. सोलापूरच्या अतुल आवताडे या तरुणाने एकाच मांडवात दोन सख्या जुळ्या बहिणींसोबत लग्न केले. या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यानंतर एकाचवेळी २ मुलींशी लग्न केल्याप्रकरणी नवरदेव अतुल अवताडे  चांगलाच अडचणीत आला.

अकलूज पोलीस ठाण्यात अतुलविरोधात तक्रार नोंदवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हे प्रकरण नेले. मात्र आता सोलापूर न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे अतुलला मोठा दिलासा मिळाला आहे. त्याबाबत आज सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेत सदर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली. 

जुळ्या बहिणींशी लग्न केल्यानं पोलिसांत तक्रार दाखल; तरुणावर कारवाई होणार?, जाणून घ्या...!

अतुलविरोधात दाखल झालेल्या तक्रारींनूसार पोलिसांनी न्यायालयात तपास करण्याची परवानगी मागितली असता, न्यायालयाने अदखलपात्र गुन्ह्यात तपास करता येत नाही असे आदेश दिले, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. न्यायालयात यावर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने पीडित कोण आहे?, असे विचारले. कारण तक्रार करणारा हा पीडित नव्हता. जुळ्या बहिणींपैकी कोणी असेल किंवा संबंधित लग्न करणाऱ्याचे पाहिले लग्न झाले असेल आणि पहिल्या बायकोने तक्रार दिली असेल तर तपास करा, असा आदेश न्यायालयाने दिल्याचं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं. 

अतुल अवताडेने पहिले लग्न केले असेल तर पहिल्या पीडित पत्नीने संबंधित पोलीस ठाण्यात येऊन तक्रार द्यावी. त्यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून, आम्ही न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील तपास करू, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सध्यातरी अतुल आणि जुळ्या बहिणींना दिलासा मिळाल्याचे सांगितले जात आहे. 

नेमकं प्रकरण काय?

जन्म, बालपण, शिक्षणच काय, तर नोकरीही एकत्रित असा जीवनाचा प्रवास एकत्रित करणाऱ्या रिंकी व पिंकी या जुळ्या बहिणींची ही आयुष्याची गोष्ट. दोघींना एकमेकींची इतकी सवय लागली की, त्या एकमेकींशिवाय राहणे कठीण बनले होते. इतकेच काय, तर एकमेकींची आवड- निवडही एकसारख्याच झाल्या होत्या. कांदिवली येथील रिंकी व पिंकी उच्च विभूषित असून आयटी क्षेत्रात मोठ्या पगारावर नोकरी करणाऱ्या जुळ्या बहिणी. वडिलांच्या पश्चात आईसोबत राहत होत्या. 

सहा महिन्यांपूर्वी रिंकी, पिंकी व आई आजारी पडल्या होत्या. यावेळी अंधेरी येथे राहणाऱ्या अतुल या टॅक्सी ड्रायव्हरने तिघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिघींच्या कुटुंबात पुरुष नसल्याने माणुसकीच्या नात्याने अतुलने तिघींची रात्रंदिवस सेवा केली. यामुळे तिघींना अतुलविषयी आपुलकी निर्माण झाली. यातूनच जुळ्या बहिणींतील एकीचे प्रेम हे अतुलबरोबर जडले, पण दोघींनी एकमेकींना कधीच सोडले नसल्याने त्या विभक्त होऊन राहू शकत नसल्याने दोघींनी अतुलशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नSolapurसोलापूरPoliceपोलिस