शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
आरक्षणाचा वाद: “मनोज जरांगे पाटील यांना ‘बिग बॉस’मध्ये घ्या”; लक्ष्मण हाकेंचा खोचक टोला
3
'काँग्रेस आणि पाकिस्तानचा एकच अजेंडा', 370 च्या मुद्यावरुन अमित शाह यांची जोरदार टीका
4
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
5
मुलाला अटक होताच आमदारानं केलं सरेंडर; घरात सापडला १७ वर्षीय तरुणीचा मृतदेह 
6
Video - सेल्फीचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर उभा असताना आली ट्रेन, 1 सेकंद उशीर झाला असता तर...
7
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
8
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
9
कोण आहेत मुकेश अहलावत? ज्यांना दिल्लीतील आतिशींच्या मंत्रिमंडळात मिळालं स्थान
10
"लॉरेन्स बिश्नोईला पाठवू?" भल्या पहाटे सलीम खान यांना धमकी, बुरखाधारी महिलेने रस्ता अडवून...
11
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
13
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
14
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
15
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
16
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
17
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
18
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
19
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
20
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता

शेअर्समध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली हजारो जणांना कोट्यवधींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:49 AM

वडाळा येथील कॉल सेंटर उद्ध्वस्त; ११ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : शेअर्समधील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत भारतासह परदेशातील दोन ते तीन हजार नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. वडाळा येथे ट्रेड ग्लोबल मार्केटअंतर्गत त्यांचे सुरू असलेले कॉल सेंटरही गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष-३ने ही कारवाई केली आहे.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून वडाळा येथील अन्टॉप हिल वेअरहाउसमध्ये “ट्रेड ग्लोबल मार्केट”  ही मंडळी भारतीय तसेच अमेरिकन नागरिकांना इंटरनेटद्वारे कॉल करायचे. कॉलर ट्रेड ग्लोबल मार्केट या कंपनीच्या वेबसाइटवरून फॉरेक्स शेअर्स करन्सी व कमोडिटी ट्रेडिंग करण्याबाबत यू. के. बेस कंपनीतून बोलत असल्याचे सांगून कॉल सेंटर चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने छापा टाकून याचा पर्दाफाश केला आहे. आरोपी हे कॉलसेंटरमधून ते यू. के., दिल्ली व मुंबई येथून बोलत असल्याचे भासवून परदेशातील व भारतातील नागरिकांना झॉईपर सॉफ्टवेअरवरून कॉल करून प्रत्येक ग्राहकाला कमीत कमी ५०० ते १००० डॉलर इतकी रक्कम क्रेडिट करायला सांगून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवायचे. पुढे, रक्कम क्रेडिट होताच ती परत न करता फसवणूक करत होते.

विनापरवाना सुरू होता व्यवसाय...

कारवाईदरम्यान ही मंडळी कोणतेही परवाने न घेता, अनधिकृत कॉल सेंटर चालवित असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी आतापर्यंत २ ते ३ हजार ग्राहकांशी संपर्क साधून कोट्यवधी रुपयाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळावरून १५ लॅपटॉप, १ डेस्कटॉप, २ राउटर, ०१ लॅन मशीन व इतर साहित्यासह ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस उपआयुक्त (प्रकटीकरण) प्रशांत कदम, प्रभारी पोलिस निरीक्षक सोपान काकड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी श्यामराव पाटील, सोनाली भारते, समीर मुजावर, आरीफ पटेल, सुधीर पालांडे आणि अंमलदार यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारीshare marketशेअर बाजार