रशियाने युक्रेनवर हल्ला केला, युक्रेन या संकटाचा सामना करत आहे. यानंतर देशांतर्गत लूटमारीच्या घटनाही समोर येऊ लागल्या. सततच्या हल्ल्यामुळे युक्रेनला मोठा फटका बसला असून या संधीचा फायदा समाजकंटक घेताना दिसत आहेत. दरम्यान, अशाच एका समाजकंटकास खांबाला बांधून शिक्षा करण्यात आली. युक्रेनच्या लोकांनी लुटारूंना पकडले. यानंतर त्याची पँटही काढण्यात आली.डेलीमेलच्या वृत्तानुसार, कीवमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यानंतर एक माणूस लुटमार करत होता. त्यानंतर या व्यक्तीला एएमआयसी पेट्रोल स्टेशनवर खांबाला बांधण्यात आले. त्याचवेळी त्याची पँट गुडघ्यापर्यंत खाली उतरवली होती. समोर आलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती या कथित लुटारूवर ओरडताना दिसत आहे. या फोटोत बाजूला पोलिसांची गाडीही दिसत आहे.
तसे, रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केल्यापासून अनेक गुन्हेगारांनी सुपरमार्केट, पेट्रोल स्टेशन आणि बँकांना सतत लक्ष्य केले आहे. युक्रेनचे सशस्त्र सेना रशियाच्या विरोधात मोर्चा काढत असताना, युक्रेनचे नागरिक मात्र अशा लोकांनाच लक्ष्य करत आहेत. तसेच युक्रेनच्या अनेक शहरांमध्ये अशा घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. यामध्ये असे कथित दरोडेखोर लॅम्पपोस्ट, टेलिफोनच्या खांबाला किंवा कार्डबोर्डच्या कोणत्याही साईनबोर्डला बांधलेले दिसतात. त्याचवेळी सर्वसामान्य जनता अशा लोकांवर संताप व्यक्त करताना दिसत आहे. 'द स्पेक्टेटर'च्या वृत्तानुसार, काही आरोपींना हिमवर्षावात नग्न करून मारहाण करण्यात आली. ही लूट फक्त लोकांनीच केली आहे असं नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक रशियन सैनिकही सुपरमार्केट लुटताना दिसले आहेत.