शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: विराट-रोहितने लाखोंच्या जनसमुदायासमोर एकत्र जल्लोष करून ट्रॉफी उंचावली तेव्हा...
2
अंबानींकडून एका दिवसासाठी एवढी 'तगडी' रक्कम वसूल करतोय जस्टिन बिबर, रिहानाही पडली मागे!
3
राम मंदिरातील पुजाऱ्यांचं वेतन ठरलं, थेट खात्यात जमा होणार पैसे! अँड्रॉइड फोनचीही परवानगी, पण...
4
सुनक की स्टार्मर? ब्रिटेनमध्ये आज मतदान; लाखो भारतीय मतदारांचा कौल कुणाकडे, पाहा...
5
“कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे”: अमोल कोल्हे
6
Team India Arrival LIVE: 'वानखेडे'वर पोहोचताच विराट-रोहितचा जबरदस्त डान्स!
7
मुंबईकरांना सलाम; हजारो चाहत्यांमध्ये अडकली ॲम्ब्युलन्स, लगेच मोकळी करुन दिली वाट...
8
कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला, सरकारने मालकाला थेट तुरुंगात पाठवला, कारण वाचून बसेल धक्का
9
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
10
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
11
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
12
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
13
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
14
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
15
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
16
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका
17
60 वर्षांत 400 अपघात, 200 पायलट शहीद...'फ्लाइंग कॉफिन' MiG-21 हवाई दलातून हटवणार
18
“शरद पवारांच्या नेतृत्वात राज्यात मविआ सरकार अन् राष्ट्रवादी...”; रोहित पाटलांचे सूचक विधान
19
हेमंत सोरेन पुन्हा झारखंडचे मुख्यमंत्री, तुरुंगातून सुटल्यानंतर घेतली CM पदाची शपथ
20
"...तर आपण सर्व नामशेष होऊ"! इस्रो प्रमुख सोमनाथ यांचा पृथ्वीवासीयांना मोठा इशारा

धक्कादायक! लव्ह मॅरेज करून ६ महिन्यातच पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे केले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 10:30 AM

दिल्लीच्या श्रद्धा हत्याकांडासारखं उत्तर प्रदेशात पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

मुजफ्फरनगर - उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथे एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लव्ह मॅरेज केल्यानंतर पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना आरोपी पतीला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं आहे. निर्दयीपणे आरोपी पतीने पत्नीचे शिर कापले आणि त्यानंतर हात वेगळे केले, मृतदेहाचे ४ तुकडे केले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज नावाच्या आरोपीनं ६ महिन्यापूर्वी उत्तराखंड येथे राहणाऱ्या २१ वर्षीय चाहतसोबत लग्न केले आणि कुटुंबाला न सांगता भाड्याने खोली घेऊन दोघे राहू लागले. एक आठवड्यापूर्वी अरबाजनं चाहतची धारदार शस्त्राने हत्या केली आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाचे ४ तुकडे केले. तिचे मुंडके आणि हात वेगळे केले. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्याला अटक केली. 

एका खबऱ्याकडून पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. २ व्यक्ती बाईकने काली नदीच्या दिशेने जात आहेत आणि त्यांच्या  जवळील एक पोतं नदीत फेकून देण्याचा प्रयत्न करत आहेत. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच एक आरोपी तिथून फरार होण्यास यशस्वी झाला तर दुसऱ्या युवकाला पोलिसांनी पकडले. तपासात त्या पोत्यात मुंडके नसलेला मृतदेह सापडला अशी माहिती पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी दिली.

पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. जवळपास ६ महिन्यापूर्वी चाहतसोबत लग्न केले होते. मात्र लग्नानंतर अनेकदा आमच्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. सतत भांडणे व्हायची. त्यामुळे माझ्या एका सहकाऱ्यासोबत मिळून ७ दिवसांपूर्वी चाकूने गळा कापून तिची हत्या केली असं आरोपीने तपासात सांगितले. सध्या पोलिसांनी दुसऱ्या आरोपीला अटक करण्यासाठी एक पथक नेमलं आहे. त्याचसोबत हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे. 

दिल्लीत घडलं होतं श्रद्धा वाल्कर हत्याकांड

याआधी दिल्लीत एका प्रियकराने प्रेयसीची गळा दाबून हत्या केली होती. आफताब असं त्या आरोपीचं नाव होतं. आफताब आणि श्रद्धा वाल्कर हे दोघेही एकत्र राहायचे. मात्र त्यांच्यात काही कारणांवरून वाद सुरू झाले. या वादाचे रुपांतर अखेर हत्याकांडात झाले. आफताबनं श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते. हे तुकडे घरच्या फ्रिजमध्ये ठेवले होते. मे २०२२ मध्ये ही घटना घडली होती. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी