कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली आहे. कुशीनगरच्या खिरिया गावात ही घटना घडली. ऊसाच्या शेतात मिळालेल्या मृतदेहाची चौकशी करताना पोलिसांसमोर हे खळबळजनक सत्य बाहेर पडले. त्यानंतर पती-पत्नीच्या नात्याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले. प्रियकरासोबत पतीची हत्या केल्यानंतर पत्नीने पती बेपत्ता झाल्याची तक्रार स्वत: पोलीस स्टेशनला नोंदवली. मृतदेह सापडल्यानंतर खोटे अश्रू ढाळले. मात्र तपासात पत्नीच आरोपी असल्याचं समजल्याने अनेकांना धक्का बसला.
१३ फेब्रुवारीला तुर्कपट्टी येथील खिरिया गावात ऊसाच्या शेतात मुन्ना मध्देशियाचा मृतदेह सापडला. मुन्ना मध्देशियाची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेला आत्महत्येचं स्वरुप देण्यासाठी मृत व्यक्तीच्या हातात धारदार शस्त्र ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले. या प्रकरणाचा तपास केला असता पोलिसांना सत्य कळालं. सुरुवातीला पोलिसांनी मृत मुन्नाच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले. त्याने एका व्यक्तीशी खूप वेळा बोलल्याचे आढळले. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला चौकशीला बोलावले तेव्हा खाकीचा दाखवताच पत्नीने हत्येची कबुली पोलिसांना दिली.
पतीला लागली भनकमुन्ना मध्देशिया हा कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ओमान येथे कामाला गेला होता. त्याची पत्नी रेखा मुलासह एकटी घरी राहयची. तेव्हा रेखाच्या जवळच्या नात्यातील प्रसाद तिच्या घरी येऊ जाऊ लागला. पती दूर असल्याने या दोघांमध्ये जवळीक वाढली. हळूहळू दोघांमध्ये अनैतिक संबंध तयार झाले. ३ वर्षांनी जेव्हा पती ओमानवरून परतला तेव्हा त्याला या संबंधाबद्दल भनक लागली. पती बाहेर असताना रेखाने पैमे जमा केले होते. जे प्रियकरासोबत मौजमज्जेसाठी खर्च करायची. मुन्नाने पती रेखा आणि प्रसादच्या संबंधांना विरोध केला असता या दोघांनी त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
रेखा आणि प्रसाद दोघांनी मिळून मुन्नाची हत्या केली. त्यानंतर पत्नी रेखाने पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली. दरम्यान प्रसादने मुन्नाचा मृतदेह ऊसाच्या शेतात फेकून दिला. या घटनेचा तपास करणाऱ्या पोलिसांना पत्नी रेखाच्या बोलण्यावर संशय आला. त्यांनी पत्नीला चौकशीसाठी बोलावले तेव्हा खाकीचा धाक दाखवताच रेखाने हत्येची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी प्रियकर प्रसाद आणि रेखाला अटक केली.