सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवरदरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुंबई परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतल्याचे समजते. दरोड्याच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असून त्यांची सराईत टोळी असल्याचेही समजते.गुरुवारी दुपारी कोपर खैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेवरदरोडा पडल्याची घटना घडली होती. बँकेत आलेल्या अज्ञात दोघांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना चाकू व पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकररूम उघडण्यास भाग पाडले होते. यानंतर लॉकर मधील सुमारे साडेचार लाखाची रोकड लुटून त्यांनी पळ काढला होता. याप्रकरणी कोपर खैरणे पोलिसठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. तपासादरम्यान सीसीटीव्ही मधून संशयितांची माहिती समोर आली होती. त्याद्वारे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी तपास पथके तयार केली होती. त्यामध्ये सहायक निरीक्षक शेख यांच्या पथकाला मुंबईत लपलेल्या संशयितांची माहिती मिळाली होती. यानुसार शुक्रवारी रात्री उशिरा पथकाने त्याठिकाणी छापा टाकला असता तिघेजण हाती लागले आहेत. तर त्यांचे इतर दोन ते तीन साथीदार अदयाप फरार आहेत. लॉकडाऊन मध्येsसर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त असतानाही घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. तर भरदिवसा बँकेवर दरोडा टाकून गुन्हेगारांनी पोलिसांनाही आव्हान दिले होते.या टोळीने बँक परिसराची रेकी करून दरोडा टाकला होता. बँकेत दोघेजण दरोडा टाकत असताना बाकीचे साथीदार बाहेर पहारा देत होते असेही तपासात समोर आले आहे. गुन्हा घडल्यानंतर बँकेतील सीसीटीव्ही व परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी तपासाला सुरवात केली होती. त्याद्वारेच गुन्ह्याचा उलगडा झाल्याचे समजते. परंतु याप्रकरणी अद्याप तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अन्य महत्वाच्या बातम्या...
९० वर्षीय नवऱ्याला रॉकेल टाकून पेटवले अन् स्वत:ही जीव सोडला; कारण ऐकून धक्का बसेल
गुंतवणूकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून तिघांना लाखोंचा गंडा
अखेर पाक सरकार झुकलं; कुलभूषण जाधव यांना भारतीय दूतावासातील २ अधिकारी भेटणार
...अन् 'बेबी पेंग्विन' हॅशटॅग ट्रेंड झाला!; जाणून घ्या आदित्य ठाकरेचं काय आहे 'कनेक्शन'
मदरशामध्ये शिक्षकाने चार वर्षे केला विद्यार्थिनीवर बलात्कार; आता गुन्हा दाखल झाला
पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये २५ वर्षीय तरुणीचं लैंगिक शौषण, विकृत प्रकार आला समोर