मातृत्वाला काळिमा फासणारी घटना, एक दिवसाच्या मुलाला दिले टाकूनकांता हाबळे नेरळ - कोरोना विषाणूमुळे महामारीचा काळ सुरु आहे. मात्र या काळात माणुसकीचे दर्शन सगळीकडे दिसून आले. असे असताना स्वतःच्या पोटी जन्म घेतलेल्या मुलाला थोड्याच वेळात टाकून देऊन मातृत्वाला काळिमा फासल्याची घटना नेरळ येथे घडली आहे. तर या मुलाला स्वच्छ पुसून पोलिसांच्या मदतीने दवाखान्यात दाखल करत निस्वार्थ ममत्व त्याच गावातील आशा रुके यांनी दाखवून दिले आहे. सध्या या नवजात बाळाची प्रकृती स्थिर असून त्याच्या पालकांचा शोध पोलीस घेत आहेत.
मूल नाही म्हणून मंदिर, मस्जिद, दर्गा, चर्च, बाबा, फकीर, डॉक्टर असे कोणते उपाय नाहीत जे एखाद दाम्पत्य करत नाही. बाळासाठी नेक अनेक प्रयत्न त्यांचे सुरु असतात. त्यामागे कारण फक्त एकच आपलं बाळ असावं. अशी अनेक दाम्पत्य आपण आपल्या आजूबाजूला पाहत असतो. आणि त्यांची बाळासाठीची धडपड पाहून आपले हृदय हि त्यांच्यासाठी पिळवटून निघते. मात्र कर्जत तालुक्यात या उलट एक हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेने मातृत्वाला काळिमा फासला गेला हे मात्र नक्की. दिनांक ०३ जुलैच्या पहाटे आपल्या पोटी जन्म घेतलेल्या बाळाला काही तासातच आईने अंधारात नेरळ कोंबळवाडी येथे तसेच सोडून दिले होते. शुक्रवारी 3 जुलै रोजी सकाळी ७ च्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज आल्याने कोंबळवाडी विमल पार्क या चाळीतील रहिवाश्यांनी कोणाचे बाळ रडते याचा शोध घेतला. मात्र, आवाज चाळीच्या मागून येत असल्याने त्यांनी तिथे जाऊन पहिले तर चाळीच्या मागे खड्यात अंगावर एकही कपडा नाही, सोबत नाळ, अंगाला लागलेले रक्त, अशा स्थितीत काहीच वेळापूर्वी जन्मलेले एक बाळ आढळून आले. त्या बाळाच्या अंगावर मुंग्या चढून त्या त्याचा चावा घेत होत्या त्या वेदनेने ते बाळ कण्हत होते. हे दृश्य पाहताच येथील आशा रुके या महिलेने तात्काळ घरातील कापड आणून त्या बाळाच्या अंगाला लागलेल्या मुंग्या व रक्त पुसून काढले. तसेच नेरळ पोलिसाना या घटनेची माहिती देऊन पोलिसांच्या मदतीने त्या बाळाला डॉ. देशमुख यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले.
या घटनेची नेरळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. भादंवि कलम ३१७ अन्व्ये याबाबत गुन्हा दाखल नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक तात्या सवांजी हे या बाळाला सोडून जाणाऱ्या आईचा शोध घेत आहेत. दरम्यान या बाळाला आपण सांभाळू अशी भूमिका आशा रुके व त्यांचे पती विनोद रुके यांनी घेतली आहे. त्यासाठी शासकीय नियमात आपण त्या बाळाला दत्तक घेऊन त्याचे संगोपन करू असे देखील रुके दाम्पत्याने सांगितले आहे.
त्या बाळाला आपण हातात घेताच त्या विषयी माझे ममत्व जागे झाले मला त्याचा लळा लागला आहे. गेले अनेक वर्षे आम्हाला मूल बाळ नाही. त्यासाठी अनेक दरवाजे आम्ही ठोठावले मात्र १० वर्षात आम्हाला मुलाचे सुख मिळाले नाही. या बाळाच्या रूपात आम्हाला आमचे भविष्य दिसत आहे. देवाने आम्हाला सर्व सुख दिले मात्र मुलाचे सुख मिळाले नाही तेव्हा या साठी शासकीय सर्व सोपस्कार पार पडण्याची आमची तयारी आहे पण ते बाळ आम्हाला मिळाले पाहिजे. - आशा विनोद रुके रहिवाशी,
अन्य महत्वाच्या बातम्या...
लज्जास्पद! पोलीस अधिकाऱ्याने महिलेसमोर केले हस्तमैथुन, घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Sushant Singh Rajput Suicide : तपासाला वेग, आत्महत्येवेळी घरात सिद्धार्थ देखील होता उपस्थित
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भन्साळींना 'समन्स', बॉलिवूड विश्वात खळबळ
अॅसिडने जळालेले होते चेहरे, प्रेमीयुगुलाचे झाडाला लटकलेले आढळले कुजलेले मृतदेह
कोरोना रुग्णाकडून अतिरिक्त पैसे आकारल्याने मुंबईतील नामांकित रुग्णालयाविरोधात पालिकेची तक्रार
धक्कादायक! बलात्कारास विरोध करणाऱ्या अल्पवयीन मुलीस जिवंत जाळले, मदतीसाठी ढसाढसा रडत होती