पुणे : महाराष्ट्राचा उल्लेख कायम पुरोगामी राज्य असा केला जात असताना या राज्यात महिलांवरी अत्याचारांच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या क्राईम इन महाराष्ट्र मध्ये दिसून आले आहे. २०१८ मध्ये राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात १०.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
राज्य गुन्हे अन्वेषण विभागात शुक्रवारी महाराष्ट्रातील गुन्हे
२०१८ चे प्रकाशन सीआयडीचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत गुन्हे घडण्याच्या प्रमाणात महाराष्ट्र ७ व्या क्रमांकावर आहे. देशभरात २०१८ मध्ये ३१ लाख ३२ हजार ५४ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी महाराष्ट्रात ३ लाख ४६ हजार २९१ गुन्हे दाखल झाले होते. महाराष्ट्रात २०१८ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये १०.९५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबई शहरात सर्वाधिक ६ हजार ५८ महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे दाखल झाले होते. लोकसंख्येंच्या तुलनेत महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण विचारात घेता अमरावती शहरात (१ लाख महिलामागे) १४४.४४ इतके आहे. राज्यात हे प्रमाण ६०.४३ इतके आहे. अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये १२.६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरोड्याच्या गुन्ह्यात १७.९४ टक्के वाढ झाली आहे. तर जबरी चोरीच्या गुन्ह्यात १५.१८ टक्के वाढ झाली आहे. मालमत्तेच्या गुन्हे २०१७ पेक्षा २०१८ मध्ये १७ हजार ९९१ ने वाढ झाली आहे. २०१८ मध्ये गुन्हे शाबीत होण्याचे प्रमाण ४१.४१ टक्के इतके आहे. राज्यात २०१८ मध्ये १७ हजार ९७२ व्यक्तींनी आत्महत्या केल्या. तर १३ हजार ८६३ जणांचा रस्त्यावरील अपघातात मृत्यु झाला होता. महाराष्ट्र २०१८ मध्ये २ हजार १९९ खुन झाले होते. खुनामध्ये महाराष्ट्राचा देशात १४ वा क्रमांक लागतो. अपहरण व पळवून नेणे यामध्ये राज्याचा क्रमांक ८ वा आहे़ तर, बलात्काराच्या घटनेत राज्याचा २२ वा क्रमांक आहे. विनयभंगच्या प्रकरणात महाराष्ट्राचा ९ वा क्रमांक लागतो. सीआयडी गुन्हे अहवाल तयार करण्यासाठी सांख्यिकी शाखेतील अतिरिक्त अधीक्षक रामकृष्ण कोल्हे, उपअधीक्षक मनोहर हरपुडे, उपअधीक्षक राजेंद्र गुजर, एस. सी. सोनवणे, अनिल तांबे, ए. एम. मुल्ला, डी. एस. कहडणे, एस. एस. पवार, एम. बी. घुले, एस. एस. तारू, डी. आर. साळुंके, आर. एस. पिंप्रीकर, व्ही. के. गोडे, ए. पी. इंगोले, जे. पी. धनुरकर आदींनी परिश्रम घेतले.
गुन्हे शिर्ष २०१७ २०१८ वाढ/घटखुन २१०३ २१९९ ९६दरोडा ६४३ ७६९ १२६जबरी चोरी ६४५१ ७४३० ९७९मालमत्तेचे गुन्हे ११११६३ १२९१५४ १७९९१स्त्रियांवरील अत्याचार ३१९९७ ३५४९७ ३५००अनुचित जाती १६८९ १९७४ २८५अनुसुचित जमाती ४६४ ५२६ ६२एकूण भा़ दं वि़ गुन्हे २८८८७९ ३४६२९१ ५७४१२
अन्य महत्वाच्या बातम्या...
खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार
सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला
Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा
बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल