मुंबई - मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदनामीकारक बातमी प्रसिद्ध केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून रिपब्लिक टीव्हीचे वार्ताहर, अँकर आणि चॅनेलच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अँकर आणि वरिष्ठ सहाय्यक संपादक शिवानी गुप्ता, उपसंपादक सागरिका मित्र, उपसंपादक शावन सेन, कार्यकारी संपादक नारायणस्वामी आणि संपादकीय कर्मचारी, तसेच न्यूजरुम प्रभारी, संबंधित न्यूज प्रसारित करण्यासाठी संपादकीय कर्मचारी आणि न्यूजरूम प्रभारी व इतर यांच्याविरोधात पोलीस (अप्रितिची भावना चेतवणे) अधिनियम 1922 कलम 3(1) व भादंवि कलम 500(बदनामी करणे) व 34 (सामायिक कृत्य) अंतर्गत गुन्हा ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्यूज टुनाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने 22 ऑक्टोबरला एक वृत्त प्रसारित केले होते. त्यात इतर तपास अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली होती. या वृत्तामुळे मुंबई पोलिस दलाची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून पोलीस आयुक्तांची बदनामी करण्यात आल्यावरून पवार यांनी याप्रकरणी तक्रार केली.
रिपब्लिक चॅनेलच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
By पूनम अपराज | Published: October 23, 2020 7:06 PM
Criminal Offence registered on Editorial staff of Republic News Channel : मुंबई पोलिसांच्या विशेष शाखा-1 च्या सोशल मीडिया लॅबमध्ये कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शशीकांत पवार यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी ना.म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे पवार हे कार्यरत असताना बिगेस्ट न्यूज टुनाईट या मथळ्याखाली रिपब्लिक टीव्हीने 22 ऑक्टोबरला एक वृत्त प्रसारित केले होते. त्यात इतर तपास अधिकारी, पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात नकारात्मक प्रतिमा तयार करण्यात आली होती.