शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

डोंबिवलीत वाढत्या चोरीच्या घटना, पोलिसांच्या आवाहनाला मिळतेय ‘तिलांजली’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 1:01 AM

घरगुती नोकर, भाडेकरू, सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांची इत्यंभूत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळविण्याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याला घरमालकांकडून तिलांजली देण्यात येत आहे.

- सचिन सागरेडोंबिवली : घरगुती नोकर, भाडेकरू, सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांची इत्यंभूत माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात कळविण्याबाबत पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही त्याला घरमालकांकडून तिलांजली देण्यात येत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या दुर्लक्षामुळेच नोकर, सुरक्षारक्षक हेच घरभेदी ठरत असल्याचे मागील काही दिवसांत घडलेल्या काही घटनांवरून दिसून आले आहे.घरगुती नोकर, सुरक्षारक्षक, वाहनचालक यांचे फोटो, रेशनकार्ड, आधारकार्ड, पत्ता आदींची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये घरगुती नोकरांचा आढळलेला सहभाग लक्षात घेता नागरिकांनी, अशी माहिती पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते. काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांना तपासासाठी या माहितीचा उपयोग होऊ शकतो. मात्र, ठरावीक नागरिकांनीच आपल्या नोकरांची माहिती पोलीस ठाण्यात कळवली आहे.पूर्वेतील एमआयडीसीतील मिलापनगर परिसर म्हणजे उच्च मध्यमवर्गीय व श्रीमंत लोकांचा परिसर म्हणून ओळखला जातो. येथे बांधकाम व्यावसायिक, सोन्याचे व्यापारी, डॉक्टर यांच्यासारख्यांचे बंगले आहेत. त्यामुळे येथील बंगल्यांत घरकाम करणारे नोकर आणि सुरक्षारक्षकांची मागणीही जास्त असते. नोकरांनीच ऐवज लंपास केल्याच्या विविध घटनांची नोंदही गेल्या काही वर्षांमध्ये पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे. अनोळखी लोकांना कामावर ठेवल्यानंतर चोरीचे प्रकार घडल्यास तपास रेंगाळल्याची उदाहरणेही आहेत. बहुतांश कामगार विश्वासू आणि प्रामाणिक असल्याने मालक बिनधास्त असतात. त्यांच्या जीवावर बंगला सोडून ते बंगल्याबाहेर पडतात. पण, हा अतिविश्वास मालकांच्याच अंगलट येत असल्याचे मागील काही घटनांवरून दिसून येत आहे. मालकाच्या विश्वासापेक्षा त्यांच्याकडे असलेल्या सोन्याचांदीच्या दागिन्यांकडे नोकरांचे जास्त लक्ष असते. नोकरांनी हाच ऐवज घेऊन पोबारा केल्याचे प्रकार घडले आहेत.अनेक नोकरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसते; पण त्यांना दररोज दिसणारी मोठी रक्कम, सोन्याचे दागिने या लालसेला बळी पडून ते चोरी करतात. त्यांची संपूर्ण माहिती घेऊन नोकरांना कामावर ठेवावे, असे आवाहन पोलीस करतात. पण, गुन्हा घडतो, त्या वेळी नोकराची पूर्ण माहिती मालकांकडे नसल्याचे समोर आले आहे.माहिती न दिल्यास दंड, शिक्षा; सुशिक्षितांनाही माहिती नाही!घरीकाम करणारे नोकर, सुरक्षारक्षक आणि भाडेकरू यांची इत्यंभूत माहिती देण्यासाठी सक्ती करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत.पोलिसांनी ही माहिती मागितली आणि ती देण्यास टाळाटाळ केल्यास संबंधितांना दंड किंवा शिक्षा होऊ शकते. मात्र, या कायद्याचा सुशिक्षितांच्या शहराला विसर पडल्याचे चित्र दिसून येते आहे.या कायद्याबाबत पुरेशी जागृती होत नसल्यामुळे उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये राहत असलेल्या सुशिक्षितांनाही या नियमांची माहिती नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली