शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Ind vs Eng: तर चौथ्या कसोटीतील पराभवानंतरही भारत WTC च्या अंतिम फेरीसाठी ठरेल पात्र, असं आहे समीकरण  

By बाळकृष्ण परब | Published: March 03, 2021 7:24 PM

Indian Cricket team News : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे.

नवी दिल्ली - तिसरी कसोटी जिंकून भारतीय संघाने आयसीसी विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. आता चौथ्या कसोटीत विजय मिळवल्यास किंवा हा सामना अनिर्णित राखल्यास भारतीय संघ थेट अंतिम फेरीत जाणार आहे. मात्र या सामन्यात पराभव झाला तरी भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध लॉर्ड्सवर रंगणाऱ्या पहिल्या कसोटी विश्वअजिंक्यपदाचा अंतिम सामन्यात खेळता येणार आहे. त्याच्यामागे एक विशिष्ट्य कारण आहे.  (So even after losing the fourth Test, India will qualify for the WTC finals, that's the equation)याआधीच्या समीकरणांनुसार इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ३-१, २-१ किंवा २-० असा विजय मिळवल्यास भारतीय संघ विश्वअजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणार आहे. तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यास ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीची संधी असेल. मात्र आता ऑस्ट्रेलियाची ही संधी हुकण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाची आयसीसीकडे तक्रार केली आहे. तसेच दौरा रद्द केल्याने ऑस्ट्रेलियावर दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांच्या गुणांमध्येही कपात करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता आयसीसीने अशी कारवाई केल्यास ऑस्ट्रेलियाची कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळण्याची अंधूक आशाही मावळणार आहे. या संदर्भातील वृत्त सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिले आहे. दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पयनशिपच्या रँकिंगमध्ये कोरोनामुळे बदल करण्यात आले आहे. आता सांघांची रँकिंग पर्सेंटेज पॉईंट्सच्या आधारावर निर्धारित होत आहे. भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटीनंतर पॉईंट्स टेबलवर नजर टाकल्यास भारतीय संघ ७१ पर्सेंटेज पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ७० टक्के पर्सेंटेज पॉईंट्ससह न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया ६९.२ पर्सेंटेज पॉईंट्ससह तिसऱ्या आणि इंग्लंड ६४.१ पर्सेंटेज पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. 

टॅग्स :ICC World Test Championshipजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाIndian Cricket Teamभारतीय क्रिकेट संघVirat Kohliविराट कोहलीIndia VS Englandभारत विरुद्ध इंग्लंड