नवी दिल्ली – संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या रिपोर्टमुळे भारतासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यामध्ये ISIS ही दहशतवादी संघटना भारतासाठी धोकादायक बनण्याची चिन्हं दिसत आहेत. रिपोर्टनुसार ISIS चे १८०-२०० सदस्य भारतात सक्रीय आहेत. हे सदस्य केरळ आणि कर्नाटकसारख्या राज्यात पसरले आहेत. त्याचसोबत ISIS ने भारतात विलायह ऑफ हिंद प्रांत बनवण्याची घोषणा केली आहे.
एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत रिपोर्ट दाखवला आहे. संयुक्त राष्ट्राच्या या रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की, भारतात ISIS कोविड १९ नावाखाली लोकांकडून पैसे मागत आहेत, लोकांमध्ये त्यांचा प्रोपेगेंडा पसरवत आहे. एका मॅगजीनच्या सहाय्याने लॉकडाऊन दरम्यान ISIS चा प्रोपेगेंडा पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. यात मुस्लीम समुदायाच्या लोकांना भारतात कोरोना व्हायरसचा फैलाव करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. कोरोना महामारी संधी असून यामाध्यमातून जिहाद पसरवण्याचं सांगितलं जात आहे.
भारतीय तपास यंत्रणा यादिशेने चौकशी करत असून त्यांना यशही मिळालं आहे. त्यांनी केरळ आणि कर्नाटकातून काही संशयित लोकांवर कारवाई केली आहे. हे सर्व लोक टेलीग्रामच्या माध्यमातून त्यांचे संघटन चालवत होते. त्यासोबत फेसबुकवर फेक नावाने सक्रीय होते. सध्या स्पेशल सेल आणि राष्ट्रीय सुरक्षा संस्था खुरासान मॉड्यूलची पडताळणी करत आहेत. जे मॅगजीनद्वारे प्रोपेगेंडा पसरवत आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात हिना बशीर बेग, जहानजेब, अब्दुल बाशित, सादिया अनवर शेख आणि नबेल यांचा समावेश आहे. हे सर्व सीएए आणि नागरिकत्वा सुधारणा कायद्याच्या नावाखाली युवकांना भडकावत होते, दिल्लीत लोन वुल्फ अटक प्लॅनिंगदेखील करत होते. त्यासोबत दहशतवादी कारवाया करण्यासाठी स्फोटकांची मागणी करत होते.
इस्लामिक स्टेट(ISIS) ने पहिल्यांदाच भारतात प्रांत स्थापन करण्यात यशस्वी झालं आहे. न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार काश्मीरात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांच्या चकमकीनंतर हा दावा करण्यात आला आहे. या प्रांतचं नाव विलायह ऑफ हिंद असं ठेवलं आहे. एप्रिलमध्ये इराक आणि सिरीयातून आयएसच्या वर्चस्वाला धक्का पोहचल्यानंतर त्यांनी आत्मघातकी हल्ल्याचं प्रमाण वाढवलं आहे काही महिन्यांपूर्वी श्रीलंकेत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट केले होते यात २५३ लोकांचा मृत्यू झाला होता.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
पहिला कोरोना संशयित आढळल्यानं उत्तर कोरियात आणीबाणीची घोषणा
केंद्र सरकारची मोठी योजना; पेट्रोल, डिझेल, सीएनजी नाही तर आता ‘HCNG’ वर कार धावणार
“ज्याची कुवत सगळ्यात कमी लेखली गेली तोच पक्षाचा सर्वोच्च नेता अन् राज्याचा मुख्यमंत्री झाला”
तुकाराम मुंढेंना 'फुल सपोर्ट'; उद्धव ठाकरेंची 'जन की बात'
मी कोणाच्या उज्ज्वल भवितव्याच्या आड येत नाही, पण...; उद्धव ठाकरेंचा नेम अजित पवारांवर?