दुबईतीत एका भारतीय जोडप्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 18 जून रोजी घडली. दुबई पोलिसांनी या जोडप्याची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक केली असून तो पाकिस्तानचा नागरिक असल्याचे समजते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याची हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचे सांगण्यात येत आहे.
हिरेन अधिया आणि विधी अधिया असे या जोडप्याचे नाव आहे. ते दुबईतील अरेबियन रँचेसमध्ये राहत होते. हिरेन अधिया यांचा शारजा येथे व्यवसाय होता. दरम्यान, दुबई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच, आरोपीकडून चोरी केलेली ज्वेलरी जप्त केली आहे. याशिवाय, दुबईतील भारतीय दूतावासालाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, हिरेन अधिया आणि विधी अधिया यांच्या मित्रांशी, स्थानिक अधिकारी आणि त्यांच्या समाजातील काही सदस्यांच्या संपर्कात भारतीय दूतावास आहे. यासंदर्भातील बातमी गुजराती माध्यमात 19-20 जून रोजी प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, दोन ते तीन वर्षांपूर्वी हे जोडपे दुबईत स्थायिक झाले होते. या दोघांचे भारतात बरेच नातेवाईक आहेत.
आणखी बातम्या...
हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'
"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी रिक्षावाल्याचा 'देसी जुगाड', व्हिडीओ पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!
चीनमधील कंपन्यांसोबत करण्यात आलेले करार जैसे थे!