मुंबई - भारतीय क्रिकेटपटू कृणाल पंड्या याला गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (सीएसएमआयए) थांबविण्यात आले आहे. त्याच्याकडे नियमापेक्षा अधिक सोनं आढळून आल्याचे तपासात दिसून आले आहे. प्रवासादरम्यान त्याच्याजवळ हवाई वाहतूक नियमावलीतील प्रमाणापेक्षा जास्त सोनं सापडलं आहे, अशी माहिती मिड डेने दिली आहे.
मुंबई विमानतळावर ठरलेल्या प्रमाणापेक्षा जास्त सोनं आणल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल संपल्यानंतर कृणाल पांड्या भारतात परतत असताना ही कारवाई करण्यात आली. दुबईहून येताना त्याच्याकडे जास्त सोनं सापडलं. त्यामुळेच डीआरआयनं (महसूल गुप्तचर विभाग) त्याला ताब्यात घेतले आहे.
२०१६ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण झाल्यापासून पांड्या मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाला आहे. कृणालने आतापर्यंत ५५ सामने खेळले आहेत आणि ८९१ धावा केल्या आहेत आणि ४० विकेट्स घेतले आहेत. कृणालचा आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट स्कोअर ८६ तर सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचा आकडा ३/१४ आहे.