गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई: कॉलेजच्या शेवटच्या वर्षांत शिकणाऱ्या २० वर्षांच्या विद्यार्थ्याने घरात शस्त्र लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मालाड पूर्व परिसरात शुक्रवारी संध्याकाळी उघडकीस झाला. याप्रकरणी सहा महिने नजर ठेवून असणाऱ्या कुरार पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याकडून गावठी कट्टे आणि काडतुसे हस्तगत केली आहेत. शनिवारी त्याला कोर्टात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे असुन यासाठी त्याला एका मित्राने मदत केल्याची माहिती आहे.चिराग उर्फ पप्पू कैलास जाधव (२०) असे अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो आप्पापाडाच्या ओमसाई सिध्दी वेलफेअर सोसायटीमध्ये कुटुंबासोबत राहतो. कुरार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहितकुमार जाधव यांना शुक्रवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास 'टीप' मिळाली की सदर परिसरात राहणाऱ्या तरुणाने आक्षेपार्ह वस्तु स्वतःकडे बाळगली आहे. त्यानुसार परिमंडळ १२ चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे आणि कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली जाधव आणि पथकाने चिरागच्या घरचा दरवाजा ठोठावला. तेव्हा त्यानेच दार उघडले आणि स्वतःचे नाव सांगितले. तुझ्या घराची झडती घ्यायची आहे असे त्याला जाधव यांनी सांगितले तेव्हा त्याने परवानगी दिली.
घरात शोध घेताना एक प्लास्टिकची पिशवी त्यांना सापडली. ज्यात त्यांना दोन गावठी कट्टे आणि।दोन जीवंत काडतुसे सापडली. त्याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अधीक माहिती देण्याचे टाळले. त्याने हे कट्टे विक्रीसाठी उत्तर प्रदेशमधुन आणले आणि गेल्या सहा महिन्यांपासून ते घरात लपवुन ठेवले होते. त्यानुसार कुरार पोलीस तेव्हा पासून त्याच्यावर लक्ष ठेवून होते आणि अखेर त्याचा गाशा गुंडाळून त्याच्याकडून शस्त्र ताब्यात घेण्यात आले.कट्टे आणण्यामागचे कारण काय ?चिराग हा महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्गात शिकत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले असून काही महिन्यांपूर्वी एका मित्रासोबत तो उत्तर प्रदेशाला गेला होता. तिथुन त्याने हे कट्टे विकत आणले. त्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याने हे शस्त्र विक्रीसाठी आणले की त्यामागे अन्य काही घातपात करण्याचा त्याचा इरादा होता याची चौकशी पोलीस करत आहेत. तसेच त्याला मदत करणाऱ्या मित्रालाही अटक होण्याची।शक्यता आहे.अकरा इंच कट्टे आणि तीन इंच काडतुसे !चिरागच्या घरी सापडलेल्या दोन कट्ट्यापैकी एका कट्ट्याचा लोखंडी मूठ काळी असून दोन्ही बाजुस लाकडी आवरण व त्यावर काळसर रंगाच्या लोंखडी धातुची बॉडी आहे. याकट्टयाची एकुण लांबी ११ इंच तर लोखंडी बॅरलची लांबी साडे सहा इंच असून त्यात लोंखडी हॅमर, लोंखडी ट्रिगर बॅरल उघडण्यासाठी असलेले लॉकही लोखंडी आहे. तर दुसरा कट्टा पिवसळसर रंगाच्या धातुची बॉडीचा असून त्याचा मूठ लोखंडी आहे. त्याच्या दोन्ही बाजुस लाकडी आवरण असुन या कट्टयाची एकुण लांबी ११.३ इंच व लोखंडी बॅरलची लांबी ७ इंच असून त्यातही लोंखडी हॅमर, ट्रिगर, बॅरल उघडण्यासाठी असलेले लोंखडी लॉक आहे. तर दोन जिंवत काडतुसाची लांबी प्रत्येकी ३ इंच असुन त्यांच्या कॅपवर ८ एमएम आणि केएफ असे इंग्रजीमध्ये लिहीलेले आहे.