नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. याच दरम्यान मध्य प्रदेशमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. राजेंद्र नगर पोलीस ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री कार आणि बाईकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बाईकवरुन जाणाऱ्या डिलिव्हरी बॉयचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी कारमध्ये चार तरुणी होत्या आणि चौघीही दारूच्या नशेत होत्या. मद्यधुंद अवस्थेत तरुणीने डिलिव्हरी बॉयला उडवल्याचं समोर आलं आहे. राजेंद्र नगर पोलिसांनी कार चालविणाऱ्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय नगर येथून पार्टी करून कारमधून या तरुणी राजेंद्र नगरसाठी रवाना झाल्या होत्या. गार्गी माहेश्वरी नावाची तरुणी कार चालवत होती. ती एमआयजी कॉलनीत राहणारी आहे. तरुणी खूप फास्ट कार चालवित होती. यादरम्यान अचानक नियंत्रण सुटल्यामुळे तीनदा पलटी होऊन कार दुसऱ्या बाजूला जाऊन पडली. याच दरम्यान देवीलाल नावाचा डिलिव्हरी बॉय कारखाली आला. देवीलाल याच्या अंगावरुन कार गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.
तरुणी दारूच्या नशेत होत्या. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तरुणींना यातून बाहेर काढले. कार चालविणाऱ्या तरुणीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लखनऊमध्ये भररस्त्यात एका तरुणीने कॅब ड्रायव्हरला मारहाण केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मारहाणीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. तरुणीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकारानंतर आता अशीच दुसरी धक्कादायक घटना समोर आली आहे. आणखी एका महिलेने कारचालकाच्या कानशिलात लगावल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावरच ती महिला थांबली नाही तर तिने बॅटने देखील कारचालकाला मारहाण केली आहे.
...अन् आणखी एका महिलेने लगावली कारचालकाच्या कानशिलात, भररस्त्यात केली बॅटने मारहाण; Video व्हायरल
सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होणारा हा व्हिडीओ पानिपतच्या शेरा गावातील आहे. एका महिलेने कारचालकांशी आधी वाद घातला. त्यानंतर त्याच्या कानशिलात लगावली. तिने बॅटने देखील त्याला मारहाण केली. तसेच आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले आणि कारचालकाची धुलाई केली. जवळपास अर्धा तास रस्त्यावर हा हायवोल्टेज ड्रामा सुरू होता. यामुळे रस्त्यावर वाहतुकीचा देखील खोळंबा झाला. कारचालकाने 112 नंबरवर फोन करून आपला जीव वाचवला. तसेच याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून महिलेविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. डीएसपी सतीश वत्स यांनी दिेलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं देखील म्हटलं आहे.