विवाहित महिलेचा तरुणावर जडला जीव, पतीने प्रियकराची केली अशी हालत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2022 20:49 IST2022-06-17T20:49:36+5:302022-06-17T20:49:44+5:30
Extra Marital Affair : विवाहितेसोबत संबंध ठेवणे योग्य नसल्याचे सांगत तरुणाच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण संपवले.

विवाहित महिलेचा तरुणावर जडला जीव, पतीने प्रियकराची केली अशी हालत
इंदूर : इंदूरच्या गांधीनगरमध्ये एका पतीने पत्नीच्या प्रियकरावर चाकूने जीवघेणा हल्ला करून मृत्यूच्या दारात लोटले आहे. या तरुणावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू आहेत. महिलेने काही बहाण्याने तरुणाला बोलावले होते. त्याला पाहताच नवरा त्याच्यावर हल्ला करत तुटून पडला. त्या व्यक्तीला गंभीर जखमी करून पती पत्नी दोघेही पळून गेले. पोलिसांनी पती-पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. तरुण आणि आरोपीच्या पत्नीमध्ये प्रेमसंबंध सुरू होते, असे तरुणाच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. विवाहितेसोबत संबंध ठेवणे योग्य नसल्याचे सांगत तरुणाच्या कुटुंबीयांनी हे प्रकरण संपवले.
गांधी नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून रोजी एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती पोलिस ठाण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. त्यानंतर अजय दमठिया असे जखमी तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. तो 23 वर्षांचा असून महावीर मार्ग येथे राहतो. बडा बांगड़दा येथे राहणारा सुभाष आणि रिद्धी-सिद्धी अपार्टमेंटमध्ये राहणारी त्याची पत्नीने मारहाण केल्याची तक्रार तरुणाने केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही महिला तिच्या पतीपासून खूप दिवसांपासून वेगळी राहत होती. याच दरम्यान तिची अजयशी मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांचे प्रेमसंबंध झाले.
नातेवाइकांनी तरुणाला समजावले
कसा तरी हा प्रकार महिलेचा पती सुभाषला कळला. ही गोष्ट त्याला अजिबात आवडली नाही आणि त्याने पत्नीला अनेकदा समजावून सांगितले. दोघांमध्ये अनेक वाद झाले. यानंतर अजयच्या कुटुंबीयांनी त्याला समजावून सांगितले की, विवाहित महिलेसोबत संबंध ठेवणे ही चांगली गोष्ट नाही. यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. दरम्यान, अजय आणि सुभाष यांच्यातही बोलणी झाली आणि वाद मिटला. हा वाद पूर्णपणे संपुष्टात आल्याचे पीडित तरुणाच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यानंतर असे का झाले, हे समजण्यापलीकडे आहे.