शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

Indore Love Jihad: जिम ट्रेनरने नाव बदलून केलं लग्न, प्रेग्नन्सीनंतर तरूणी डॉक्टरकडे गेली तेव्हा झाला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 4:12 PM

Indore Love Jihad : सध्या पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. वर्षभर त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलं होतं.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) इंदुरमध्ये(Indore) लव्ह जिहादशी )Indore Love Jihad)) संबंधित एक प्रकरण समोर आलं आहे. इथे एका मुस्लिम तरूणाने आपलं नाव बदलून आधी तरूणीसोबत मैत्री केली आणि नंतर खोटं बोलून तिच्याशी लग्न केलं. सध्या पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. वर्षभर त्याने तिच्यापासून हे लपवून ठेवलं होतं. तो मुस्लिम असल्याचा खुलासा हॉस्टिलमध्ये झाला.

खोटं नाव सांगून केलं होतं लग्न

ही घटना इंदुरच्या द्वारकापुरी भागातील आहे. इथे राहणाऱ्या तरूणीची भेट एका जिम ट्रेनरसोबत एका पार्टीमद्ये भेट झाली होती. त्यावेळी त्याने तिला त्याचं नाव गब्बर असल्याचं सांगितलं होतं आणि दोघांचं प्रेमप्रकरण सुरू झालं. त्यानंतर दोघांनी लग्नही केलं. तोपर्यंत तरूणीला माहीत नव्हतं की, तरूण मुस्लिम आहे. (हे पण वाचा : महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न!)

कसा झाला खुलासा?

नुकतीच तरूणीची तब्येत बिघडली होती आणि आपलं अल्ट्रासाउंड करण्यासाठी गेली तेव्हा अल्ट्रा साउंड संचालकाने तिला तिच्या पतीचं आधार कार्ड मागितलं. जेव्हा आरोपी तरूणाने आपलं आधार कार्ड दिलं तेव्हा तिला समजलं की, आपला नवरा मुस्लिम आहे. तेव्हा तिला समजलं की, तरूणाचं नाव मुस्तफा आहे आणि त्याने नाव बदलून तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर तरूणीने पोलिसात जाऊन तक्रार दिली.

सध्या तरूणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत आहे. घटनचे माहिती मिळाल्यावर हिंदू संघटनेचे कार्यकर्तेही पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तिथे त्यांनी गोंधळ घातला. 

टॅग्स :Love Jihadलव्ह जिहादMadhya Pradeshमध्य प्रदेशCrime Newsगुन्हेगारी