लुटेरी दुल्हन! बाळाला जन्म दिल्यावर सासरला लुटून फरार व्हायची, जास्त वयाच्या पुरूषांना बनवत होती शिकार....
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 10:27 AM2021-03-13T10:27:38+5:302021-03-13T10:32:13+5:30
या महिलेने नुकतंच राजस्थानमधील उमेद राजपुरोहितला शिकार बनवलं होतं. उमेदच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक केली.
इंदुर पोलिसांनी एका 'लुटेरी दुल्हन'ला अटक केली आहे. ही महिला वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन जास्त वयाच्या पुरूषांसोबत लग्न करत होती. आणि त्यानंतर पैसे-दागिने घेऊन फरार होत होती. इंदुर पोलीस आता या महिलेच्या नेटवर्कचा शोध घेत आहे. या महिलेने नुकतंच राजस्थानमधील उमेद राजपुरोहितला शिकार बनवलं होतं. उमेदच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तिला अटक केली.
उमेदने पोलिसांना सांगितले की सात एप्रिल २०१६ ला लक्ष्मीबाईसोबत त्याने बिजासन माता मंदिरात लग्न केलं होतं. लग्नानंतर एक तीन वर्षाची आणि एक दीड वर्षांची मुलगी आहे. पीडित व्यक्तीने महिलेवर आणि तिच्या आई-वडिलांवर गंभीर आरोप लावत सांगितले की, मुलीचं खोटं लग्न लावून देऊन माझ्याकडून त्यांनी ६ लाख रूपये घेतले. (हे पण वाचा : आता बोला! 'तू काळा आहेस' म्हणत पत्नी पतीला सोडून गेली, पती न्यायासाठी कोर्टाच्या दारात....)
आतापर्यंत तीन लग्ने
उमेदने इंदुर पोलिसांना सांगितले की, लुटेरी दुल्हनचं आधी मुंबईत एक लग्न झालं होतं. तिला पहिल्या पतीकडून एक मुलगी आहे. पती आणि मुलीला सोडून ती दागिने आणि पैसे घेऊन आई-वडिलांकडे परत आली होती. त्यानंतर तिने माझ्यासोबत लग्न केलं. आम्हाला दोन मुली आहेत. यानंतर घरातील सहा लाख रूपये आणि दागिने घेऊन ती फरार झाली. (हे पण वाचा : नसबंदीनंतरही पाचव्यांदा गर्भवती राहिली महिला; अकरा लाख रुपयांची मागितली नुकसान भरपाई)
पीडित उमेदने पोलिसांना सांगितले की, घरी गेल्यावर त्याची पत्नी लक्ष्मीबाईने अहमदाबादमधील एक व्यक्तीसोबत तिसरं लग्न केलं. उमेदच्या तक्रारीवरून आरोपी महिला लक्ष्मीबाई, तिचे वडील राजू खेलनसिंह सनोरिया आणि तिची आई कमलाबाई यांच्यावर इंदुर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सांगितले की महिलेची चौकशी सुरू आहे. लवकरच इतरही आरोपींना अटक केली जाऊ शकते.