कर्ज घेऊन महागडे शौक केले पूर्ण, वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या किडनॅपिंगचं नाटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 13:49 IST2025-03-27T13:49:22+5:302025-03-27T13:49:56+5:30
महागडे शौक आणि कर्जामुळे त्रस्त असलेल्या एका तरुणाने त्याच्या तीन मित्रांसह स्वतःच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचली.

कर्ज घेऊन महागडे शौक केले पूर्ण, वडिलांकडून पैसे उकळण्यासाठी स्वतःच्या किडनॅपिंगचं नाटक
मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये महागडे शौक आणि कर्जामुळे त्रस्त असलेल्या एका तरुणाने त्याच्या तीन मित्रांसह स्वतःच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचली. त्याने त्याच्या वडिलांकडून एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणात भंवरकुआ पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.
इंदूरच्या भंवरकुआ पोलिसांना सिधी येथील रहिवासी श्रीराम गुप्ता यांनी माहिती दिली की, कोणीतरी त्यांच्या मुलाचं अपहरण केलं आहे आणि १ लाख रुपयांची मागणी केली जात आहे. पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी तात्काळ एक पथक तयार केले. याच दरम्यान नंबर ट्रेस करत आणि संशयितांची चौकशी करत असताना पोलीस भंवरकुआ पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आरुष अरोरा आणि तेजवीर सिंग या दोन मुलांपर्यंत पोहोचले.
पोलिसांनी दोन्ही मुलांची चौकशी केली असता, एक मोठा खुलासा झाला. अपहरणाची कहाणी स्वतः सतीश गुप्ता आणि त्याच्या तीन मित्रांनी रचल्याचं आढळून आलं. त्याने त्याच्या मित्राच्या फोनवरून आपल्या वडिलांना फोन करून माहिती दिली आणि खंडणी मागितली. यामध्ये सतीश गुप्ता याला सोडण्याच्या बदल्यात एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
पोलिसांनी सतीश गुप्ता यांची चौकशी केली तेव्हा असं उघड झालं की, तो त्याच्या महागडे शौक आणि जास्त कर्जामुळे त्याने हे केलं. त्याने त्याच्या तीन मित्रांसह स्वतःच्या अपहरणाची खोटी गोष्ट रचली होती. पोलिसांनी सतीश गुप्ता आणि त्याच्या तीन मित्रांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.