मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh Crime News) इंदुरमध्ये एका महिलेने पतीबाबत जो खुलासा केला ज्याबाबत समजल्यावर सगळेच हैराण झाले. लसूडिया भागातील राहणाऱ्या महिलेचं लग्न 29 एप्रिल 2018 ला 32 वर्षीय इंजिनिअर दिलेश्वरसोबत झालं होतं. दोन वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनी लग्न केलं होतं. लग्नानंतर दिलेश्वर पत्नी घेऊन पुण्याला गेला. त्यांच्यासोबत पूर्ण परिवारही शिफ्ट झाला. पुण्यात दिलेश्वर सासू आणि नणंद सतत तक्रार करत होते. यानंतर पत्नीने इंदुरमध्ये येऊन महिला पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.
पीडितेने यादरम्यान पोलिसांना सांगितलं की, पती लग्नानंतर नेहमीच दूर दूर राहत होता. लग्नानंतर कधीच ते जवळ आले नाही. जेव्हाही ती पतीच्या जवळ जात होती तेव्हा पती वेगळ्या रूममध्ये जात होता. दरम्यान पीडितेला पतीवर संशय आला आणि ती पतीवर सतत नजर ठेवत होती. अशात पत्नीला पतीबाबत जे समजलं त्यामुळे ती हैराण झाली.
पीडितेला आढळलं की, पती सायंकाळ होताच महिलांसारखा श्रृंगार करत होता. ज्याप्रकारे महिला कपाळावर टिकली, हेअर बॅंड, कानातले घालतात तसेच ओठांवर लिपस्टिक लावतात त्याचप्रमाणे पती सजत होता. जेव्हा तिने याला विरोध केला तेव्हा तिला मारहाण करण्यात येत होती. यानंतर पती पीडितेला इंदुरला सोडून गेला. त्यानंतर तिला परत घ्यायला आलाच नाही. त्यानंतर पत्नीने पोलिसात तक्रार केली आणि कोर्टाकडे न्याय मागितला.
कोर्टाच्या आदेशावरून महिला आणि बाल विकास विभागाने एका गोपनीय रिपोर्ट तयार केला आणि कोर्टाकडे सोपवला. या रिपोर्टमध्ये सिद्ध झालं की, महिलेसोबत कौटुंबिक हिंसा झाली आहे. न्यायालयाने महिलेच्या याचिकेवर निर्णय देत पतीला तीस हजार रूपये प्रति महिना तिला देण्याचा आदेश दिला आहे. कोर्टाने असंही सांगितलं की, हे पैसे तिला 5 मार्च 2021 पासून द्यावे लागतील.