नवी दिल्ली - देशातील बहुचर्चित शीना बोरा हत्याकांडात तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला बुधवारी सर्वोच्च न्यायालयातून जामीन मिळाला आहे. जवळपास सात वर्षांनी तुरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जीला यातून मोठा दिलासा मिळाला आहे. इंद्राणी मुखर्जी ही तिच्याच मुलीच्या शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. ती ६ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात असल्याच्या कारणावरून सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. इंद्राणीने असा युक्तिवाद केला होता की, तिचा खटला सहा वर्षांहून अधिक काळ सुरू आहे. त्यावर आता लवकर कारवाई होण्याची शक्यता नाही. इंद्राणी मुखर्जीला तिच्या ड्रायव्हरने केलेल्या खुलाशानंतर २०१५ मध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली होती.
शीना बोरा ही पहिल्या पतीची मुलगी होतीया हायप्रोफाईल हत्याकांडाचा तपासही सीबीआयने केला, मात्र हे प्रकरण अद्याप सुटलेले नाही. हे असे एक मर्डर मिस्ट्री आहे, ज्याचे गूढ आजपर्यंत उलगडलेले नाही. हत्येचे गूढ इतके गुंतागुंतीचे होते की, सुरुवातीला शीना बोराचा मृतदेह इंद्राणी मुखर्जीने तिची बहीण असल्याचे सांगितले होते, मात्र पोलिसांच्या चौकशीत तिने ती आपली मुलगी असल्याचे उघड केले. इंद्राणी मुखर्जीने दोन लग्न केले होते. शीना बोरा ही तिच्या पहिल्या पतीची मुलगी होती.शीना जिवंत असल्याचा दावा केला होतागेल्या वर्षी इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता आणि ती काश्मीरमध्ये आहे. या दाव्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इंद्राणी मुखर्जीने सीबीआय संचालकांना सांगितले होते की, तिची मुलगी जिवंत आहे आणि ती सध्या काश्मीरमध्ये आहे, तपास यंत्रणेने तिचा शोध सुरू करावा.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील जंगलात एका मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला आहे. स्थानिक लोकांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ओळख पटवण्याचा प्रयत्न केला, मात्र छिन्नविछिन्न मृतदेहामुळे ओळख पटू शकली नाही. पोलिसांनी मृतदेहाचा नमुना घेऊन तो फॉरेन्सिक रिपोर्टसाठी पाठवला आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तीन वर्षांपासून पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते, मात्र ठोस निष्पन्न झाले नाही. २०१५ मध्ये ड्रायव्हरच्या खुलाशामुळे पोलिसांना या प्रकरणाची उकल करण्यात मदत झाली होती.