शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

अमानवीय कृत्य! कर्जाच्या हप्त्यासाठी कर्जदाराला डांबून ठेवले, सिगारेटचे चटके दिले

By अनिल गवई | Published: October 27, 2022 1:29 PM

वंचितच्या शहराध्यक्षासह चौघाविरोधात गुन्हा दाखल. तीन दिवस दारू पिऊन या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सलग तीन-चार महिने कर्जाचे हप्ते थकविल्याने एका खासगी कंपनीच्या कर्जवसुलीदारांनी कर्जदारास तीन दिवस डांबून ठेवत सिगारेटचे चटके दिले. सोबतच अमानविय कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिडीत कर्जदाराच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीसांनी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांसह चौघांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केल्याने शेगाव शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.

शेगाव येथील अशफाक खान मेहता (३२) यांनी शेगाव पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्यांनी कॅपिटल नामक खासगी कंपनीकडून प्रवासी मालवाहतुकीसाठी कर्ज घेतले. दरम्यान वाहनाचा व्यवसाय मंदित आल्याने, कर्ज घेऊन घेतलेले वाहन अकोला येथील एका व्यक्तीला विकले. या व्यवहारापोटी कायदेशीर रित्या त्याकडून नोटरी करून घेऊन कजार्ची रक्कम तो फेडेल असा करारनामा केला. मात्र, सदर कर्जदाराने फायनान्स कंपनीकडे रक्कम भरली नसल्याने रविवारी खामगाव येथील चार जणांनी शेगावात येऊन कर्जदार अशफाक खान याला रेल्वे स्टेशन जवळ थांबवून त्याचे अपहरण करीत स्थानिक विश्रामभनात नेले. तेथे रात्री उशिरापर्यंत बेदमपणे मारहाण केली. यानंतर सदर कर्जदाराला मोटरसायकल वर बसवून खामगाव शहरातील शंकर नगर भागातील एका घरात नेऊन तिथे दाबून ठेवले यानंतर चौघांनी सदर कर्जदाराला बेदमपणे मारहाण करीत संपूर्ण शरीरावर सिगारेटचे चटके दिले.

हा अत्याचार त्यांचा दिवसभर चालला सतत तीन दिवस दारू पिऊन या कर्जदाराचे हातपाय बांधून अत्याचार केले.  इतकेच नव्हे तर कर्जदाराकडून दोन चेकवर स्वत:च्या हस्ताक्षरात शहरात सात लाखांच्या रकमाही टाकून घेऊन व्हिडिओ बनवण्यात असल्याचे  अशफाक खान यांचे म्हणणे आहे. त्यानंतर  गाडी परत आणून देतो, या आश्वासनानंतर गंभीर जखमी असलेल्या अश्फाक खानला खामगावच्या बस स्थानकावर शंभर रुपये देऊन सोडून देण्यात आले. अशपाक खान याने शेगाव गाठल्यानंतर मंगळवारी रात्री सर्व हकीकत आपल्या नातेवाईकांना सांगितली. यानंतर बुधवारी शहर पोलिसात रितसर तक्रार नोंदविण्यात आली.  यात आरोपी विजय काळे रा. शंकर नगर खामगांव,  मंगेश तायडे रा. गोंधनापूर प्रवीण बोदडे राहणार शेगाव आणि आणखी एका अनोळखी इसमांविरुद्ध अपहरणासह भादंवि कलम ३६५, ३२४, ३२३, ३४३, ५०६, ३४, ५०४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे

शेगावातून अपहरण; खामगावात दिले चटके!- वाहनासाठी घेतलेल्या कर्जापोटी हप्ते थकल्यामुळे कर्जदाराचे शेगावात अपहरण करण्यात आले. त्यानंतर खामगावातील शंकर नगरातील एका खोलीत डांबून ठेवत सिगारेटचे चटके देण्यात आल्याचे कर्जदाराने तक्रारीत नमुद केले आहे.

कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर!- तडीपारीसह विविध कलमान्वये तीन-चार गुन्हे दाखल असलेल्या एका आरोपीचा गुन्ह्यात समावेश आहे. अशातच गत काही दिवसांपासून घडणाºया घटनांमुळे शेगावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी