मुंबई - इन्स्टाग्रामवर मायलेकींना त्रास देणाऱ्या भामट्याला साकीनाका पोलिसांनी जबलपूर येथून अटक केली. तो स्पूफिंगचा (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) वापर करत होता. त्याला ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबईमध्ये आणण्यात आले. अटक करून दिंडोशी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. च्या विरोधात विनयभंग आणि ‘पोक्सो’च्या गुह्यात अटक करून ट्रान्झिस्ट रिमांडवर मुंबई येथे आणण्यात आले. मोबाईल जप्त करून तो तांत्रिक विश्लेषणाकरिता न्याय सहाय्यक प्रयोगशाळेत पाठवला जाणार आहे.
अंधेरी परिसरात राहणात्या एका मुलीचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. गेल्या वर्षी तरुणाने तिला इन्स्टाग्रामवर रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर मुलीला तिचा मोबाईल नंबर आणि कुटुंबीयांचे फोटो पाठवण्यास सांगितले. त्यानंतर पाच दिवसांनी तरुणाने मुलीला अश्लील फोटो पाठवण्यास सांगितले. तरुणाचा त्रास वाढू लागल्याने या मुलीने याची माहिती आपल्या आईला सांगितली. नातेवाईकांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेतली. साकीनाका पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस तपासात आयपी ऍड्रेस हा कराची दाखवला जात होता. दोन महिने पोलिसांनी तांत्रिक माहितीचा अभ्यास केला. अखेर पोलिसांना एक तांत्रिक माहिती मिळाली. तो आयपी ऍड्रेस कराचीचा नसून जबलपूरचा असल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी त्या तरुणाला जबलपूर येथून ताब्यात घेतले.