मुंबई - मुंबई बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिल्ली पोलीस दलाने ड्रग्ज तस्कराला अटक करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या ड्रग्ज पेडलर मागे दिल्लीपोलिसांनी एक लाखाचं बक्षीस घोषित केलं होतं. अनेक दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. मुंबईत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली पण त्याला पकडण्यासाठी पोलीस त्याच्या घरी गेले होते. पोलिसांना चकमा देण्यासाठी आरोपी हेल्मेट घालून खिडकीतून दरवाजा आतून बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र दोरी तुटल्याने तिसऱ्या मजल्यावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला.
मंगळवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांचे 3 अधिकारी ड्रग्ज प्रकरणात एनडीपीएस अंतर्गत गोरेगाव बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा आरोपी डेव्हिड हरी राय (40) याच्या अटकेसाठी मुंबईत पोहोचले. बांगूर नगर पोलीस स्टेशनमध्ये स्टेशन डायरी बनवल्यानंतर दिल्ली पोलीस बांगूर नगर पोलीस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांसह एव्हरशाईन नगर येथील हरिद्वार अपार्टमेंटमध्ये आरोपीच्या घरी पोहोचले. पोलिसांना याची माहिती मिळताच आरोपी डेव्हिड फ्लॅटच्या पाठीमागे बांधलेल्या खिडकीच्या तिसऱ्या मजल्यावर लटकलेल्या दोरीच्या साहाय्याने पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, मात्र लटकण्याची दोरी कमकुवत झाल्याने खाली पडला. बराच वेळ डेव्हिडच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो बेशुद्ध झाला. जवळच्या रुग्णालयात पोलिसांनी त्याला दाखल केले .मात्र त्याचा मृत्यू झाला.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये डेव्हिड राय अंमली पदार्थांची विक्री आणि खरेदी प्रकरणात फरार होता. याशिवाय डेव्हिड रायवर अनेक गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलिसांनी दाऊदवर एक लाखाचे बक्षीसही जाहीर केले आहे.त्याचा मृत्यूनंतर बांगूर नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास मुंबई पोलीस व दिल्ली पोलीस करत आहेत.