मुंबई - सोशल मीडियावरील पोर्टल, अकाऊंटवर हजारो बनावट फॉलोअर्स, व्हिवजर, लाईक्स मिळविल्याच्या बनावातून नागरिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटप्रकरणात मुंबईपोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी आणखी एका तरुणाला राजस्थानमधून अटक केली. विजय सुरेंद्र बांठिया ( वय 21, रा. जोधपूर, राजस्थान ) असे त्याचे नाव असून ट्रांझिस्ट रिमांडवर त्याला मुंबईत आणण्यात आले आहे.
सोशल मीडिया मार्केटींगच्या घोटाळ्याप्रकरणातील आतापर्यंतची ही चौथी अटक आहे. बांठिया याने वेबसाईटवर विविध पोर्टलच्या 9 हजारावर ऑर्डर पूर्ण केल्या असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोशल मीडियाच्या मार्केटींग बनावटगिरीत विविध कंपन्या, ब्रँडना आपली वस्तू विकण्यासाठी इन्स्ट्राग्राम, फेसबुक व्हूजर, लाईकसची सर्विस मिळवून दिले जाते, त्याबाबतची तक्रार आल्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने त्याचा तपास सुरु केला. आतापर्यंत अशा प्रकारे फसवणूक करणारे 79 पोर्टलचा छडा लावण्यात यश आले आहे. यापुर्वी अटक केलेल्या काशिफ तन्वर याच्याकडे केलेल्या चौकशीतून बांठिया याचा शोध लागला. त्याने मोठी रक्कम देऊन त्याच्याकडून बनावट फॉलोअर्स घेतले होते, त्यानुसार पथकाने जोधपूरला जाऊन त्याला अटक केली. शनिवारी मुंबईतील कोर्टात हजर केले असता 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. त्याच्याकडून आणखी नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करणारा निघाला तिचाच पती
नात्याला काळीमा! पतीने पकडून ठेवले अन् मित्र करीत राहिला पत्नीवर अत्याचार
चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या पत्रकारासह महिला आणि पुरुषास अटक
बलात्कारास विरोध केल्याने काकाने चिमुकलीचे केली हत्या, कुजलेल्या मृतदेहावर आढळल्या कुत्र्याने चावा घेतलेल्या खुणा
युपी पोलिसांचा आणखी एक कारनामा, जेलमध्ये पाटवण्याची धमकी देऊन घेतली ऑनलाईन लाच
Disha Salian Death Case : मृत्यूपूर्वी दिशा सालियननं १०० नंबरवर कॉल केला होता का? मुंबई पोलिसांनी केला खुलासा
करोडो रुपयांच्या ड्रग्जसह सापडला पेडलर, बॉलिवूड कनेक्शनबाबत भांडाफोड होणार
गँगरेप! महिलेच्या अब्रूचे लचके तोडून बनवला व्हिडीओ अन् केला व्हायरल