शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

आणखी दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह चौघांची चौकशी; एनआयएकडून आठवडाभरात समन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 11:27 AM

स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत ५ आजी-माजी पोलिसांसह दहा जणांना अटक केली आहे.

- जमीर काझीमुंबई :  वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा याच्या अटकेनंतर  पुन्हा ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये आलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) कडून आता आणखी दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह चौघा जणांकडे कसून चौकशी केली जाणार आहे. येत्या आठवडाभरात त्यांना समन्स बजाविण्यात येणार असून त्यामध्ये ठाण्यातील दोघा डॉक्टरांचा समावेश  असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. संबंधित दोघे पोलीस अधिकारी सध्या सेवेत असून त्यांचा या गुन्ह्यात सहभागाची खात्री पटल्यास अटकेची कारवाई केली जाणार आहे.

स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येप्रकरणी एनआयएने आतापर्यंत ५ आजी-माजी पोलिसांसह दहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये गेल्या गुरुवारी प्रदीप शर्माला अटक केल्याने पोलिसांबरोबरच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती.  सचिन वाझे व शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेनची हत्या केल्याची माहिती अटक केलेल्या हल्लेखोरांच्या चौकशीतून स्पष्ट झाल्याचा एनआयएचा दावा आहे; मात्र या संपूर्ण कटाचा उलगडा अद्याप झालेला नाही. या गुन्ह्याच्यावेळी मुंबई व ठाण्यात कार्यरत असलेल्या दोघा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले आहे. तसेच हिरेनच्या पोस्टमार्टेमचा अहवाल बनविलेल्या ठाण्यातील रुग्णालयातील दोघा डॉक्टरांकडे  नव्याने चौकशी केली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

यासाठी केली  जाणार चौकशी?

मुंबईतील एका अधिकाऱ्याने वाझे व त्याच्या सहकार्याने सूचना केल्या होत्या. तर ठाण्यातील अधिकाऱ्याने हिरेनचा मृतदेह गाडीतून नेला जात असताना कोणीही अडवू नये, यासाठी त्यांना ‘एस्कॉर्ट’ केले होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे या दोघा अधिकाऱ्यांना लवकरच चौकशीला पाचारण केले जाणार आहे. चौकशीतून त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शेलार, जाधवच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या संतोष आत्माराम शेलार व आनंद पांडुरंग जाधव यांची एनआयए कोठडी पाच दिवसांनी वाढविण्यात आली आहे. वादग्रस्त माजी पोलीस एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मासाठी कार्यरत राहणाऱ्या दोघांकडील तपास पूर्ण न झाल्याने न्यायालयाने सोमवारी हा निर्णय घेतला.

मालाडमध्ये राहणाऱ्या दोघांना गेल्या रविवारी अटक केली. ते अनेक वर्षांपासून शर्मा याच्यासाठी काम करत आहेत. त्याच्या व मुख्य आरोपी सचिन वाझे याच्या सांगण्यावरून ते या कटात सहभागी झाले होते. त्यांच्या एनआयए कोठडीची मुदत २१ जूनला संपली. मात्र  त्यांच्याकडील तपास प्रलंबित आहे. तसेच शर्मा व अन्य दोघांच्या समोरासमोर बसवून चौकशी करायची असल्याने एनआयएने कोठडीची मुदत वाढवून मागितली. 

प्रदीप शर्मासह पाच जणांची डीएनए चाचणी

स्फोटक कार प्रकरणासह, मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेतील वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी  प्रदीप शर्मा याच्यासह पाचजणांची डीएनए चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत. यात शर्मा याच्यासह संतोष शेलार, आनंद जाधव, सतीश तिरुपती मोथकुरी उर्फ ​​​​विक्की भाई व मनीष वसंत सोनी यांचे डीएनए नमुने घेतले. त्यासाठी एका फॉरेन्सिक टीमला एनआयएच्या कार्यालयात बोलाविले होते. मनसुख हिरेनला गाडीत मारल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यासाठी डीएनएचा अहवाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.  

एनआयएला प्रतीक्षा डायटॉम अहवालाची!

मनसुख हिरेनचा मृत्यू नेमका कशाने झाला, त्याची हत्या करून खाडीत फेकले की बेशुद्धावस्थेत असताना खाडीत फेकले, याची निश्चिती हरियाणा येथील लॅबकडून येणाऱ्या डायटॉम अहवालातून स्पष्ट होणार आहे. त्याची प्रतीक्षा एनआयएचे अधिकारी करीत आहेत. मनसुख हिरेनच्या पोटात विषाचे द्रव आढळले नव्हते, त्याच्या शरीरावर मारहाणीचे व्रण नव्हते, त्याचप्रमाणे फुप्फुसात पाणी आढळले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे एनआयए डायटॉम अहवालाची पडताळणी करणार आहे.

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणsachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिस